Friday, July 19, 2024
Homeमहत्वाची बातमी'आता मुंबईकरांकडून पण ही 'वसूली' करणार का?'

‘आता मुंबईकरांकडून पण ही ‘वसूली’ करणार का?’

भाजपा आमदार आशिष शेलार यांचा खोचक टोला

मुंबई : एक एप्रिलपासून मुंबईकरांवर मालमत्ता कराचा १४ टक्के अतिरिक्त बोजा पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते आशिष शेलार यांनी मुंबई महापालिका आणि शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे.

‘मुंबई महापालिकेतील ‘माजी’ कारभाऱ्यांनी आगामी वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला तेव्हा कोणत्याही प्रकारची कर वाढ नाही अशा फुशारक्या मारल्या. मग प्रशासक बसताच मालमत्ता करात वाढ कुठून आली? प्रशासकाच्या आडून हे करायचे ठरलं होत का?,’ असा सवाल शेलार यांनी केला आहे.

तसंच, ‘महापालिकेवर प्रशासक बसला असला तरी राज्याच्या सत्तेच्या खुर्चीत तुम्हीच बसला आहात ना? करोनामुळे मुंबईकरांचे अर्थकारण बिडलेय हे दिसतेय ना? काही मदत करु शकत नाही तर किमान मुंबईकरांचा खिसा तर कापू नका! आता मुंबईकरांकडून पण ही “वसूली” करणार का?,’ असा संतप्त सवाल शेलार यांनी केला आहे.

दरम्यान, प्रत्येक पाच वर्षांनी मालमत्ता कर वाढवण्यात येतो. यापूर्वी सन २०१५ मध्ये करवाढ करण्यात आली होती. त्यानंतर २०२०मध्ये कर वाढवण्यात येणार होता. मात्र करोनामुळे करवाढीचा निर्णय लांबणीवर पडला. २०२१मध्ये पुढील चार वर्षांसाठी म्हणजे २०२५पर्यंत पालिकेने मालमत्ता करवाढीचा निर्णय घेतला होता. सध्याच्या रेडीरेकनर दरानुसार ही वाढ करण्यात येणार होती. ही करवाढ सुमारे १४ टक्के इतकी अपेक्षित असून त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नात सुमारे एक हजार कोटी रुपयांची वाढ होणार असल्याचे सांगितले जाते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -