Friday, March 21, 2025
Homeमहत्वाची बातमीरशियाकडून युक्रेनवर 'फॉस्फरस बॉम्ब'चा वापर

रशियाकडून युक्रेनवर ‘फॉस्फरस बॉम्ब’चा वापर

कीव्ह, युक्रेन : रशिया आणि युक्रेन युद्धाचा आज २८ वा दिवस. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या इशा-यावर लष्कराकडून युक्रेनवर हल्ले सुरूच आहेत. युद्धात रशियाकडून क्रूरतेच्या परिसीमा ओलांडल्या जात असल्याचंही समोर येत आहे. याच दरम्यान, रशियानं युक्रेनच्या मारियुपोल शहरावर फॉस्फरस बॉम्बच्या सहाय्यानं हल्ला केल्याचा आरोप युक्रेननं केला आहे.

मारियुपोलवर ताबा मिळवण्याचा दावा रशियाकडून करण्यात आलेला असला तरी हा दावा फोल असल्याचंही आता उघड होत आहे. याचं कारण म्हणजे, युक्रेनियन सेनेकडून या शहरात रशियन लष्कर असलेल्या ठिकाणांवर टँकच्या सहाय्याने हल्ले करण्यात आले. युक्रेनियन सेनेच्या तुकडीच्या या हल्ल्यापूर्वी काही तास अगोदर रशियन सेनेनं मारियुपोल स्थित युक्रेनियन सेनेची अनेक तळ उद्ध्वस्त केले. या घटनेची ड्रोननं टिपलेले काही फोटोही समोर आले आहेत.

रणनैतिक दृष्टीनं महत्त्वाच्या असणाऱ्या मारियुपोल शहरात अद्यापही जवळपास दोन लाख नागरिक अडकून असल्याचं ‘ह्युमन राईटस वॉच’च्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय. या नागरिकांना भोजन, पाणी, औषधे आणि इतर मेडिकल सुविधांचा तुटवडा जाणवतो आहे.

बलाढ्य रशियाला थोपवून ठेवण्यात युक्रेन सेना बऱ्याच अंशी यशस्वी ठरत असली तरी युक्रेनच्या अनेक शहरं उद्ध्वस्त होण्यापासून बचाव करण्यात युक्रेनी सेनेला यश आलेलं नाही. रशियानं युक्रेनला उद्ध्वस्त केल्याचा दावा अमेरिकन मीडियानं सॅटेलाईट फोटो जाहीर करत केला आहे.

दुसरीकडे, रशयिानं युद्धादरम्यान फॉस्फरस बॉम्बचा वापर केल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आलाय. युक्रेनच्या मानवाधिकार संस्थेनंही युक्रेनियन नेत्यांच्या आरोपांची पुष्टी केली आहे.

फॉस्फरस हा रंगहीन रसायनाचा एक प्रकार आहे. ऑक्सिजनच्या संपर्कात आल्यानं फॉस्फरस पेट घेतं. पांढरा फॉस्फरस हा मेणासारखा मऊ तंतुमय पदार्थ दिसतो. फॉस्फरसचा वास काहीसा लसणासारखा असतो. प्रकाशात राहिल्यावर या रसायनाचा रंग हळूहळू पिवळा होत जाताना दिसतो.

फॉस्फरसचा वापर युद्धादरम्यान स्फोटकं आणि धुराच्या आवरण तयार करण्यासाठी केला जातो. पिवळा फॉस्फरस अत्यंत विषारी असून त्याचा धूरही अत्यंत घातक ठरतो.

पेट घेतलेल्या पांढऱ्या फॉस्फरसचं तापमान ८०० डिग्री सेल्सियसपेक्षाही जास्त असतं. या बॉम्बच्या स्फोटामुळे निर्माण झालेले लाखो कण पांढर्‍या धुराप्रमाणे सर्वत्र पसरले जातात. फॉस्फरस बॉम्बच्या संपर्कात आल्यानंतर कोणत्याही व्यक्तीचा तत्काळ मृत्यू संभावतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -