Wednesday, April 23, 2025
Homeमहत्वाची बातमीपाहुणे आले घरापर्यंत!, मेहुण्यावरील कारवाईनंतर मनसेचे उद्धव ठाकरेंना फटकारे

पाहुणे आले घरापर्यंत!, मेहुण्यावरील कारवाईनंतर मनसेचे उद्धव ठाकरेंना फटकारे

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्यावर ईडीने कारवाई केली आहे. त्यांच्या कंपनीच्या ११ सदनिका जप्त करण्यात आल्या आहेत. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे. त्यावर आता मनसेकडून शिवसेनेला टोला लगावण्यात आला आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी एक ट्विट केले आहे.

मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी एका चित्रपटाचा ‘मेहुणे मेहुणे, मेव्हण्यांचे पाहुणे’ हा डायलॉग ट्विट केला आहे. तसेच पाहुणे घरापर्यंत आले असल्याचा इशारा संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला आहे.

गेल्या ६ मार्च २०१७ ला ईडीनं पुष्पक ग्रुप ऑफ कंपनीज आणि पुष्पक बुलियनविरोधात पीएमएलए कायद्याअंतर्गत आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल केला होता. कंपनीचे मालक महेश पटेल, चंद्रकांत पटेल आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या एकूण २१ कोटी ४६ लाख रुपये किमतीच्या स्थावर आणि अस्थायी मालमत्तेवर ईडीनं २०१७ मध्ये तात्पुरत्या स्वरुपात जप्ती आणली होती. याप्रकरणाचे धागेदोर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यापर्यंत पोहोचले आहेत. महेश पटेल आणि पुष्पक ग्रुपने नंदकिशोर चुतर्वेदीच्या माध्यमातून २०.०२ कोटींची रक्कम बनावट कंपन्यांना हस्तांतरीत केली होती. या बनावट कंपन्यांपैकी एक असलेल्या हमसफर डिलर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून श्रीधर पाटणकर यांच्या साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडला विनातारण ३० कोटींची रक्कम देण्यात आल्याचा ईडीचा आरोप आहे. याप्रकरणी ईडीने कारवाई केली आहे.

आता पुष्पक ग्रुपची स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त केली आहे. याची किंमती जवळपास ६ कोटी ४५ लाख रुपये आहे. यात साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडच्या ठाण्यातील नीलांबरी प्रकल्पातील 11 सदनिकांचा समावेश आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -