Monday, May 5, 2025

देशताज्या घडामोडी

देशभरात होळी व धुळवड उत्साहात

मुंबई : देशभरासह मुंबईतील रस्त्यांवर, गल्लोगल्ली होळीची विधिवत पूजा करुन होळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

‘होळी’ हा हिंदूंचा पारंपरिक सण देशभरात मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा होत आहे. मुंबईसह देशभरात नागरीकांनी एकमेकांना रंग लावून होळी उत्साहात साजरी केली.

गुरुवारी मुंबईतील रस्त्यांवर, गल्लोगल्ली होळीची विधिवत पूजा करुन होळी पेटवण्यात आल्या. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला. त्याचबरोबर मुंबईतल्या कोळी लोकांनीही आपल्या परंपरागत पध्दतीने होळी उत्सव साजरा केला.

कोकणात रात्री उशीरा वाजत-गाजत होळी पेटवून पालखी नाचवतात. त्यासाठी दिवसभर मेहनत घेऊन गवत, लाकडे गोळा करुन उंच होळी उभारण्यात आल्या. शहरात होळीसाठी वखारीतून लाकडे आणण्यात आली, तर राज्यात अन्य ग्रामीण भागात गोव-यांची होळी सजवण्यात आली.

दरम्यान, मुंबईत धुळवड खेळण्यासाठी गुरुवारी सायंकाळपासूनच तरुणाई रंगली होती. कार्यालयांना शुक्रवारी सुट्टी असल्याने गुरुवारीच ठिकठिकाणी रंगांची उधळण करण्यात आली.

Comments
Add Comment