Thursday, July 18, 2024
Homeमहत्वाची बातमीठिकठिकाणची होळी

ठिकठिकाणची होळी

संपूर्ण भारतात होळी साजरी केली जाते, मात्र त्यातल्या काही ठिकाणांची ही ओळख…

होळी हा सण संपूर्ण भारतात साजरा केला जातो. ग्रामीण भागात तो वसंतोत्सव म्हणून साजरा केला जातो तर अन्य ठिकाणी त्याला विविध नावं आहेत. गुलाल, अबीर आणि पिचकाा-यांचा वापर करून ठिकठिकाणी सर्रास होळी साजरी केली जाते. काही ठिकाणी राधा-कृष्णाची मंदिरं खूप सजवली जातात. महाराष्ट्रात तर कशी होळी खेळली जाते हे आपल्यााल सगळळ्यांनाच माहिती आहे. मात्र अन्य ठिकाणी कशी होळी खेळली जाते हे पाहूया.

मथुरा

मथुरेतली होळी पाहण्यासाठी संपूर्ण भारतातील लोक येतात. कारण मथुरा ही कृष्णाची भूमी आहे. म्हणून ती कृष्णनगरी या नावाने ओळखली जाते. या ठिकाणी कृष्णाने गोपींबरोबर याच भूमीवर होळी खेळली आहे. म्हणूनच इथली होळीची मजा काही औरच असते.

या ठिकाणी होळी आठवडाभर साजरी केली जाते. या ठिकाणी कृष्णाच्या प्रत्येक मंदिरात एकेक दिवशी होळी साजरी केली जाते. वृंदावन येथील बकाई-बिहारी या मंदिरात होळी कशी साजरी केली जाते ते पाहण्यासाठी येतात. दुसरं ठिकाण म्हणजे ब्रजमधलं गुलाल कुंड. हे ठिकाण गोवर्धन पर्वताजवळ आहे. कारण या ठिकाणी कृष्णलीला सादर केल्या जातात. या ठिकाणी सगळे जण एकत्र येऊन एकमेकांवर पिचका-यांनी रंग उडवतात.

पंजाब

पंजाबमध्ये होळीला होला मोहल्ला असं म्हटलं जातं. या दिवशी ते त्यांचं पारंपरिक शस्त्र कुश्ती बाहेर काढतात. आणि मोठमोठय़ाने ओरडत एकमेकांना शुभेच्छा देतात. हलवा, मालपोवा, पुरी, गुज्जा, फणस, असे तोंडाला पाणी सुटणा-या पदार्थाची रेलचेल असते. ते होळी पेटवत नाही. हे त्यांचं वैशिष्टय़च म्हणावं लागेल. खरं म्हणजे हा सण होळीच्या दुस-या दिवशी साजरा केला जातो. विशेषत: निहांग पंथाचे शीख हा दिवस साजरा करतात.

उत्तर प्रदेश

इतर ठिकाणांप्रमाणे या ठिकाणीही होलिका दहन करूनच होळी साजरी केली जाते. भक्त प्रल्हादाच्या गोष्टीला या ठिकाणी खूप महत्त्व आहे. भांग हा पदार्थ केला नाही तर तिथली होळी अपूर्णच राहते. ठिकठिकाणी ही भांग विकली जाते. या ठिकाणी होळीच्या दिवशी लहान होळी साजरी केली जाते.

तामिळनाडू

तामिळनाडूला कामदेवासाठी होळी साजरी केली जाते. या दिवशी रती आणि गाणी म्हटली जातात. हा दिवस कामविलास, कामन पँडिगई आणि काम दहनम या नावाने ओळखला जातो.

दिल्ली

या दिवशी लोकं एकमेकांकडे आवर्जून भेट द्यायला जातात. पार्टी, म्युझिक, नृत्य आदी गोष्टींनी हा दिवस साजरा केला जातो. एकमेकांना अबिराचा तिलक लावतात आणि भेट देतात. होळीच्या दिवशी होली दहन केलं जातं. वाईटावर चांगल्याची मात म्हणून ही होळी पेटवली जाते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -