मुंबई : एमजी मोटर इंडियाने मुंबईतील मालाड (पश्चिम) येथे नवीन सर्व्हिस केंद्र सुरू करण्यात आले आहे. यावेळी एमजी मोटर इंडियाचे प्रमुख व्यावसायिक अधिकारी गौरव गुप्ता, एमजी मालाडचे डीलर प्रिन्सिपल गौतम मोदी आदी मान्यवर उपस्थित होते.
मुंबईतील प्रीमिअम एसयुव्हींसाठी प्रबळ बाजारपेठ क्षमता ओळखत एमजी मोटरच्या नवीन वर्कशॉपमध्ये कारमेकरच्या भावी ग्राहक दृष्टीकोनाचा एकूण लुक व फिल सामावलेला असून कंपनीचा ब्रिटीश वारसा देखील दिसून येतो. आतापर्यंत कारमेकरची भारतभरात ३१० टचपॉइण्ट्स केंद्रे आहेत.