मुंबई : मुंबईत महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा रसायनशास्त्राचा पेपर फुटल्याची बातमी समोर आली होती. मात्र, रसायनशात्राचा पेपर फुटला नाही, या बातम्या केवळ अफवा असल्याचे स्पष्टीकरण शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेत दिले आहे.
शनिवार, दिनांक १२ मार्च रोजी झालेल्या इ. बारावीच्या रसायनशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका फुटलेली नाही. पेपर फुटला, असा चुकीचा प्रचार काही समाजमाध्यामातून सुरू आहे. त्यात तथ्य नाहीं. या प्रकरणी आज विधानपरिषदेत मी केलेलं निवेदन. pic.twitter.com/5TnlPxChek
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) March 14, 2022
“शनिवारी दिनांक १२ मार्च रोजी झालेल्या इयत्ता बारावीच्या रसायनशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका फुटलेली नाही. पेपर फुटला, असा चुकीचा प्रचार काही समाजमाध्यमातून सुरू आहे, त्यात कोणतेही तथ्य नाही,” अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेत दिली.
विलेपार्लेमधील एका केंद्रावर एका विद्यार्थीनीच्या फोनमध्ये १० वाजून २४ मिनिटांनी प्रश्नपत्रिका आढळली होती. ही प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना पेपर वाटप झाल्यानंतर आढळली आहे. हा प्रकार गंभीर आहे, मात्र पेपर फुटलेला नाही, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.