Thursday, February 19, 2026

'द काश्मीर फाईल्स' हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करा

'द काश्मीर फाईल्स' हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करा

मुंबई : 'द काश्मीर फाईल्स' हा चित्रपट राज्यात करमुक्त करा, अशी मागणी करणारे पत्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी दिले आहे.

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादाला बळी पडलेल्या हिंदूचे चित्रण करणाऱ्या ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट राज्यात करमुक्त करावा, जम्मू काश्मीर मधील हिंदू जनतेवर मुस्लीम दहशतवाद्यांनी अनन्वित अत्याचार केले आहेत. याचे योग्य आणि खरे चित्रीकरण प्रथमच एखाद्या चित्रपटाच्या माध्यमातून या देशातल्या जनतेला पाहता येईल. द काश्मीर फाईल्स हा चित्रपट महाराष्ट्रातील जनतेने अधिकाधिक पाहावा याकरिता हा चित्रपट लवकरात लवकर करमुक्त करावा, अशी विनंती या पत्रातुन आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >