Sunday, January 19, 2025
Homeताज्या घडामोडीमुंबईसह राज्यात उष्णतेची तीव्र लाट

मुंबईसह राज्यात उष्णतेची तीव्र लाट

हवामान खात्याकडून नागरिकांना इशारा

मुंबई : राज्यात वारंवार हवामानात बदल होत असताना आता उन्हाच्या झळा सोसण्यासाठी तयार राहा, येत्या २ दिवसांमध्ये राज्यात उष्णतेची लाट येणार असून मुंबईमध्ये कमाल तापमान घसरण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत उष्णतेची लाट येणार असून नागरिकांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागणार आहे. येत्या २ दिवसांसाठी मुंबईचे कमाल तापमान ३९°सेल्शिअस राहिल आणि नंतर हळूहळू कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासंबंधी आयएमडीकडूनही माहिती देण्यात आली आहे.

‘कृपया घाबरू नका पण काळजी घ्या. किनारपट्टीच्या भागासाठी उष्णतेच्या लाटेचा निकष : कमाल तापमान सामान्य तापमानापेक्षा ४.५°C वर व कमाल तापमान किमान ३७°C असेल.’ असेही हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी देखील यासंबंधी एक ट्विट करत मुंबईत उष्णता वाढणार असल्याची माहिती दिली आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये वारंवार आपण हवामानात होणारे बदल आणि सतत होणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यात आता उष्णाचा तडाखा वाढणार आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह, राज्यातील पुणे, कोकण, मराठवाडा-विदर्भातही उष्ण तापमान असेल. या वातावरणामुळे अनेक आजार उद्भवू शकतात. त्यामुळे नागरिकांनी शरीराच्या पाणी पातळीत वाढ करावी, भरपूर पाणी प्यावे आणि काळजी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -