Wednesday, July 17, 2024
Homeदेश१२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांनाही देणार कोरोनाची लस

१२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांनाही देणार कोरोनाची लस

केंद्र सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : कोरोनाविरोधी लढाईत केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. आता देशात १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना कोरोनाची लस देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी यासंदर्भात माहिती दिली. यावर्षी जानेवारीपासून १५ वर्षांवरील मुलांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. येत्या बुधवारपासून म्हणजे १६ मार्चपासून १५ वर्षांखालील मुलांनाही कोरोनाची लस दिली जाईल, असे ते म्हणाले.

केंद्रीय आरोग्यमंत्री मांडवी यांनी यासंदर्भात ट्विट केले. ६० वर्षांवरील वृद्धांनाही खबरदारीचा डोस किंवा बूस्टर डोस दिला जाईल. ‘मुलांच्या कुटुंबीयांना आणि ६० वर्षांवरील नागरिकांना लस घेण्याचे आवाहन करतो’, असे मांडवीय म्हणाले. आता १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना कॉर्बेव्हॅक्स लसीचा डोस दिला जाईल.

देशात ३ जानेवारी २०२२ पासून देशात प्रथमच १८ वर्षांखालील मुलांना कोरोनाची लस देण्याची मोहीम सुरू झाली. तेव्हापासून १५ ते १८ वयोगटातील मुलांना ही लस दिली जात आहे. त्यामुळे मोठ्या मुलांच्या शाळा उघडणे सोपे झाले. आता १२ वर्षांच्या मुलांचेही लसीकरण करून लहान मुलांना शाळेत पाठवण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. २००८, २००९ किंवा २०१० मध्ये जन्मलेल्या मुलांचे लसीकरण केले जाईल. देशातील १८ वर्षांखालील मुलांसाठी उपलब्ध असलेली ही चौथी कोरोनावरील लस असेल.

भारताच्या ड्रग कंट्रोलर जनरल (डीजीसीआय) ने २१ फेब्रुवारीला बायोलॉजिकल-ई ची कोरोनावरील लस ‘कोर्बेवॅक्स’ला काही अटींसह आपत्कालीन वापरास मंजुरी दिली होती. ही लस १२ ते १८ वर्षे वयोगटासाठी मंजूर करण्यात आली. डीजीसीआयने १२ वर्षांवरील मुलांसाठी सर्व प्रथम ‘झायकोव-डी’ या लसीला मंजुरी दिली. भारतीय औषध नियामकाने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून कोवोव्हॅक्स या कोरोनावरील लसीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी दिली होती. कोरोनावरील विषय तज्ज्ञ समितीच्या शिफारशीच्या आधारावर डीजीसीआयने कोवोव्हॅक्सच्या आपत्कालीन वापरास मंजुरी दिली होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -