Saturday, June 29, 2024
Homeमहत्वाची बातमीपेनड्राईव्ह प्रकरण सीबीआयकडे न दिल्याने भाजपचा सभात्याग

पेनड्राईव्ह प्रकरण सीबीआयकडे न दिल्याने भाजपचा सभात्याग

मुंबई : पेनड्राईव्ह प्रकरण सीबीआयकडे देण्याची मागणी मान्य न झाल्याने विरोधकांनी अखेर सभात्याग केला. या स्टिंग ऑपरेशनचा तपास सीआयडीकडे दिल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत जाहीर केले. त्यानंतर वळसे पाटलांना उत्तर देताना देवेंद्र फडणवीसांनी आपण सभात्याग करत असल्याचे जाहीर केले आणि भाजप सदस्यांसह ते सभागृहाबाहेर पडले.

फडणवीस म्हणाले, जो पेन ड्राईव्ह मी सभागृहात दिला आहे, त्यामध्ये गिरीश महाजनांविरोधात कटकारस्थान केल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. इतरही अनेक प्रकरण यामध्ये आहेत. या परिस्थितीत राज्याचे पोलीस याची चौकशी करणार? त्यांच्यावर दबाव येणार आहे. त्यामुळे आम्ही या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी केली होती. पण वळसे पाटील यांच्यासारखा अनुभवी आणि मुरब्बी नेता देखील अडखळत होता.

त्यामुळे जोपर्यंत ही चौकशी सीबीआयकडे जात नाही तोपर्यंत आमचा लढा सुरुच राहणार आहे. याप्रकरणी आम्ही कोर्टात देखील जाणार आहोत. ही सगळी चौकशी सीबीआयकडे गेली तर फार मोठ्या प्रकरणाचा पर्दाफाश यासंदर्भात होणार आहे, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

त्याचबरोबर लांबे यांच्यासंदर्भात मी सभागृहात जी क्लीप दिली आहे. त्यातून या सरकारमध्ये ज्या लोकांची दाऊदसोबत जवळीक आहे त्यांना प्राधान्य आहे. त्यामुळं अशा लोकांची नियुक्ती तिथं होतं आहे. यामुळं ते कसे निवडून आले आहेत आणि त्यांचा राष्ट्रवादीशी काय संबंध आहे, हे जगजाहीर आहे. त्यामुळं दाऊदशी राष्ट्रवादीचे कसे संबंध आहेत याचा आम्ही पर्दाफाश केला आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाबाहेर माध्यमांशी बोलताना दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -