मुंबई : मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन मुंबईतील विशेष न्यायालयने फेटाळला आहे. न्यायाधीश आर. एन. रोकडे यांनी हा निर्णय दिला. अनिल देशमुख सध्या मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहेत.
तब्बल १०० कोटी रुपये वसुलीच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात देशमुख यांना ईडीने अटक केली होती. त्यानंतर त्यांना तुरुंगाबाहेर येण्यासाठी अद्यापही जामीन मिळालेला नाही.
दरम्यान, ईडीने २९ डिसेंबर २०२१ रोजी अनिल देशमुख आणि त्यांच्या दोन मुलांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. त्यावेळी त्यांना अटक करण्यात आली होती, तेव्हापासून ते तुरुंगातच आहेत. या प्रकरणी अनिल देशमुख यांनी सेशन कोर्टात नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र न्यायालयाने तो अर्ज फेटाळला.