स्त्रियांसमोरील सामाजिक आव्हाने

Share

तेजस्वी काळसेकर

जागतिक महिला दिन’! जस ‘दिन’ या शब्दातील वेलांटीची जागा मागेपुढे झाली की, त्या शब्दाचा अर्थ बदलतो, त्याप्रमाणे स्वतःला बदलत मागील वेलांटी न बनता पुढील वेलांटी बनत आपल्याकडे जगाचे लक्ष वेधले आहे. ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ मुळात स्त्रियांनी स्वतःच्या न्याय हक्कासाठी केलेल्या ‘मार्च’मुळेच अस्तित्वात आलेला आहे. पूर्व काळात अमेरिकेमध्ये महिलांनी ८ मार्च रोजी आपल्या अधिकारांसाठी एक मार्च काढला होता. थोडक्यात एल्गार केला होता. त्यानंतर पुढील वर्षीपासून सोशलिस्ट पार्टीने ८ मार्च या दिवशी ‘महिला दिन’ साजरा करण्याची घोषणा केली. तद्नंतर युरोप, रशियातही याच दिवशी ‘महिला दिन’ म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली. १९७५मध्ये तर संयुक्त राष्ट्रानेही ८ मार्च ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ म्हणून घोषित केला. साधारणतः महिलांना त्यांचे अधिकार, सन्मान आणि समाजात जागृती निर्माण होण्याच्या उद्देशाने महिला दिन साजरा करण्यात येतो.

८ मार्च जवळ आला की, मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. पाककला स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, खेळ पैठणीचा, बाइक रॅली, यशस्वी महिलांचा सत्कार, पुरस्कार वितरण, वृत्तपत्रे-न्यूज चॅनल्सवरही महिला दिन विशेष कार्यक्रमांची भरमार, एक दिवस रिपोर्टिंगची संधी वगैरे वगैरे. दुसऱ्या दिवशीपासून सर्व ‘जैसे थे’ सुरू होते. मुळात महिला दिन साजरा करण्याची गरजच का पडावी?, असा प्रश्न मला नेहमी पडतो. जी साक्षात जगतजननी आहे. जी फक्त माती-विटांच्या घराला घरपण देते, सर्व नाती मायेने, प्रेमाने सिंचते, कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या सुखासाठी ती झटते. स्वतःच्या घरासाठी, संसारासाठी, आपल्या माणसांसाठी स्वतःच अस्तित्व ही स्त्री विसरते तिचे अधिकार मान-सन्मान करण्यासाठी ८ मार्चचीच का गरज भासावी? फक्त या दिवशी मिळणारा मान-सन्मान, संधी प्रोत्साहन अधिकार स्त्रियांना कायम मिळाला, तर खऱ्या अर्थाने स्त्रियांचा सन्मान होईल.

स्त्री जन्म नक्कीच खूप पुण्याईनंतर मिळत असेल, कारण परमेश्वराने या सृष्टीचे सातत्य टिकवण्याची जबाबदारी सृजनशीलता स्त्रीला दिली आहे. माया, ममता, क्षमाशीलता, विनम्रता अशा विविध गुणांनी स्त्रीला परिपूर्ण केलं आहे. स्त्री म्हणून जगताना स्त्रियांसमोर अनेक आव्हाने पूर्वीही होती, आजही आहेत. माणूस हा समाजप्रिय आहे. माणसाच्या जन्मांनंतर तो या समाजाचा घटक बनतो. त्यामुळे आपसूकच समाज, सामाजिक बंधने या गोष्टीचा प्रभाव व्यक्तीवर पडतो. पुढे त्यातूनच सामाजिक समस्या, आव्हाने निर्माण होतात. काही सामाजिक आव्हानांना स्त्रीला तिच्या जन्मापासूनच किंबहुना जन्माआधीपासूनच सामोरं जावं लागतं. स्त्री ही नेहमीच आई, बहीण, पत्नी, सून अशा विविधांगी नात्यांमधून आपली कौटुंबिक जबाबदारी समर्थपणे पेलत असते. अख्ख्या घराचा ती कणा असते. मात्र पुरुषप्रधान संस्कृतीत आजही स्त्रियांना दुय्यम स्थान दिसून येते.

बहुतेक वेळा मुलीचा जन्म लपवला जातो, गुपचूप बारस उरकलं जातं. नको असताना जन्मलेली मुलगी नकोशीच नामकरणही ‘नकुशी’ म्हणूनच होतं. तिच्या जन्माचा आनंद साजरा होण्याऐवजी अरेरे! मुलगी झाली असं सांत्वन केलं होतं.

२१व्या शतकात या परिस्थितीत काही फारसा फरक पडलेला नाही. काही अपवाद वगळता शहरी व ग्रामीण भागातील शिक्षित, अशिक्षित महिलांच्या समस्या त्यांच्या समोरील सामाजिक आव्हाने वेगवेगळी असू शकतात. घरच्या मंदिरातील शांत, पवित्र तेजस्वी दीपज्योत असलेली स्त्री प्रसंगी आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी दुर्गा ही बनते. मात्र हीच स्त्री आजही कौटुंबिक हिंसाचार, सामाजिक हिंसाचार आजही झेलत आहे. शैक्षणिक समस्या, आरोग्याच्या समस्यांवर मात करण्यासाठी मूलभूत सोयी-सुविधा-संधींच्या ती शोधात आहे. आपलं हक्काचं ‘चूल आणि मूल’ हे कार्यक्षेत्र उत्तमपणे सांभाळून आज स्त्रिया वेगवेगळ्या क्षेत्रांत आपला ठसा उमटवत आहेत. मात्र उंबरठ्याबाहेर पडल्यावर सामाजिक जीवनात वावरताना ती ‘स्त्री’ असल्याने तिच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे केले जाते. स्त्रियांना निर्भय वातावरणात वावरता यावे, यासाठी म्हणावे तसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. अनेक नवनवीन कायदे येतात. पण फक्त कागदोपत्रीच राहतात, त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी तेव्हाच होईल, जेव्हा खऱ्या अर्थाने कायद्याचे संरक्षण महिलांना मिळेल.

लग्न हा महत्त्वाचा संस्कार पार पडल्यावरही स्त्रीची अवहेलना संपत नाही. मूल न झाल्यास किंवा फक्त मुलीच झाल्यास नवऱ्याकडून, सासरच्या माणसांकडून पतीच्या दुसऱ्या लग्नाची धमकी दिली जाते. सवत नावाची जखम स्त्रीला आयुष्यभर सलत राहाते. इतिहास साक्षी आहे जेव्हा जेव्हा अत्याचार, अन्याय, दृष्ट प्रवृत्तींनी थैमान घातले तेव्हा तेव्हा प्रत्यक्ष देवांनाही स्त्री शक्तीला आवाहन करावे लागले व प्रत्येक वेळी स्त्री शक्तीनेच या जगाचे सृष्टीचे रक्षण केले आहे. मग स्वतःवरील अन्यायाला प्रत्युत्तर देताना दुसऱ्याची गरज का भासावी? शेवटी एकच म्हणणं आहे, आपला कुणी तारणहार येईल याची वाट न पाहता स्वतःच्या यशाचा शिलालेख स्वतः लिहावा.

“ए सखी… राह मत देख…
अब पुनः कृष्ण ना आएंगे…
अब तो संभल जाओ,
अपना बचाव और कल्याण खुद करो,
शिक्षा और आत्मनिर्भरता से नवनिर्माण करो!!”

Recent Posts

Pahalgam Terror Attack : आता मलाही मारा ना…! काल लग्न झालं अन् आज घरातून तिरडी उठणार

१२ फेब्रुवारीला लग्न झालेल्या शुभमला पत्नीसमोर संपवलं दहशतवाद्यांनी सांगितलं पत्नीला का नाही मारलं? नवी दिल्ली…

9 minutes ago

Chardham Yatra Scam : चारधाम यात्रेला जाताय सावधान! भाविकांची होतेय मोठी फसवणूक

देहराडून : चारधाम यात्रा (Chardham Yatra 2025) येत्या ३० एप्रिल २०२५ पासून सुरू होणार आहे.…

28 minutes ago

अतिरेक्यांच्या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू, ‘या’ दिवशी राज्यात येणार पार्थिव

मुंबई : पहेलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झाला. यात तीन डोंबिवलीकर,…

29 minutes ago

काश्मीर खोऱ्यात लपले आहेत ५६ विदेशी अतिरेकी, सूत्रांची माहिती

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यामागे पाकिस्तान पुरस्कृत लष्कर - ए - तोयबा…

1 hour ago

OTT: या आठवड्यात फक्त ओटीटीवर अ‍ॅक्शन दिसणार, हे १२ चित्रपट प्रदर्शित होतील..

नवी दिल्ली: या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर फक्त अ‍ॅक्शन बघायला मिळणार आहे. अनेक नवीन चित्रपट आणि…

1 hour ago

बारामुलात दोन अतिरेकी ठार, पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर सुरक्षा पथकांची पहिली कारवाई

बारामुला : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांना लक्ष्य करुन गोळीबार केला. या हल्ल्यात २६…

2 hours ago