Friday, July 5, 2024
Homeताज्या घडामोडीराज्याच्या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस!

राज्याच्या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस!

सीएनजी स्वस्त होणार

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज, शुक्रवारी राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी महाविकास आघाडी सरकारचा तिसरा अर्थसंकल्प सादर केला. राज्य सरकारने नैसर्गिक वायूवरील करात १० टक्क्यांची कपात केली आहे. नैसर्गिक वायूचा कर १३.५ टक्क्यांवरून ३.५ टक्के इतका केला आहे. यामुळे राज्यात सीएनजी आणि पीएनजी गॅस स्वस्त होण्याची शक्यता आहे. मात्र मूल्यवर्धित कर जैसे थे ठेवल्याने पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होण्याच्या अपेक्षांवर आज पाणी फेरले.

कोरोना संकटाशी तोंड देताना कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या विकासाच्या पंचसुत्रावर आधारित राज्याचा अर्थसंकल्प आज महाविकास आघाडी सरकारतर्फे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. यासाठी येत्या तीन वर्षांकरिता चार लाख कोटींची तरतूद करण्यात आली. यातून राज्यात भरीव गुंतवणूक होऊन राज्याचा जीडीपी एक लाख कोटी डॉलर्सपर्यंत वाढेल, असे अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

आरोग्य सेवांवर येत्या ३ वर्षांत ११ हजार कोटी खर्च करणार

आरोग्य सेवांवर येत्या ३ वर्षांत ११ हजार कोटी खर्च करण्याचं सरकारचं नियोजन आहे. शासकीय ट्रॉमा केअर युनिट्स स्थापन करण्यासाठी १०० कोटी रुपये आणि आवर्ती खर्चासाठी १८ कोटींचा निधी. टाटा कॅन्सर रिसर्च सेंटरला आयुर्वेदिक संशोधन केंद्रासाठी १० हेक्टर जमीन देण्यात येईल.

सर्व जिल्ह्यांमध्ये महिला रुग्णालये उभारणार

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये महिलांसाठी रुग्णालये उभारणार असल्याची घोषणा पवार यांनी यावेळी केली. सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी महिला व नवजात शिशू रुग्णालये स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे जाहीर केले. हिंगोली, वर्धा, यवतमाळ, बुलडाणा, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, भंडारा, जळगाव, अहमदनगर, धुळे, सोलापूर, रत्नागिरी, औरंगाबाद आणि रायगड येथे प्रत्येकी १०० खाटांचे स्त्री-रोग रुग्णालय स्थापन करण्यात येतील, अशी घोषणा त्यांनी केली. अकोला आणि बीड येथे स्त्री-रोग रुग्णालयाचे बांधकाम हाती घेण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

कृषी विभागासाठी ३०२५ कोटींची तरतूद

अर्थसंकल्पात कृषी विभागासाठी ३०२५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेत सुधारणा करण्याची विनंती पंतप्रधानांकडे करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या पीक नुकसान भरपाईसाठी इतर पर्यायांचा विचार केला जाईल,असे पवार यांनी सांगितले. वसमत येथे हळद संशोधन केंद्र उभारणार असून त्यासाठी १०० कोटीची तरतूद करण्यात आली. महिला शेतकऱ्यांसाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. माजी सैनिकांसाठी यापुढे कृषी विभागाच्या योजनांमध्ये ३ टक्के निधी राखीव ठेवला जाईल. अन्न प्रक्रियेसाठी विशेष योजना राबवणार आहे. बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठ आणि वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ यांना सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त प्रत्येकी ५० कोटी संशोधनासाठी घोषणा करण्यात आली आहे.

महिला शेतकऱ्यांसाठी कृषी योजनांमध्ये ५० टक्के राखीव तरतूद

महिला शेतकऱ्यांसाठी कृषी योजनांमध्ये राखीव असलेली ३० टक्केची तरतूद आता वाढवून ५० टक्के केलेली आहे. तसंच हे वर्ष महिला शेतकरी आणि मजूर वर्ष म्हणून साजरं केलं जाईल.

तुळापूर येथे संभाजी महाराज यांच्या स्मारकासाठी २५० कोटीची तरतूद

तुळापूर येथे संभाजी महाराज यांच्या स्मारकासाठी २५० कोटीची तरतूद सरकारने केली आहे. आजच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला प्राधान्य देण्यात आले. नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांची प्रोत्साहनपर मदत घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. यासाठी १० हजार कोटींची तरतूद करण्यात आली. याचा २० लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. भूविकास बँकेच्या ३४७८८ शेतकऱ्यांची ९६४ कोटीची कर्जमाफी करण्याची घोषणा आज पवार यांनी केली. त्यामुळे या बँकेच्या शेतकऱ्यांना आज अर्थसंकल्पातून मोठा दिलासा मिळाला आहे. त्याशिवाय कर्मचाऱ्यांची २७५ कोटींची थकीत देणी अदा केली आहेत.

भूविकास बँकांचे 34 हजार 788 कर्जदारांकडे असणारे 964 कोटी रुपयांचे कर्ज माफ

महाविकास आघाडीच्या तिसऱ्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या. भूविकास बँकांचे 34 हजार 788 कर्जदारांकडे असणारे 964 कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्याची मोठी घोषणा अजित पवार यांनी केली.

मुंबईत उभारणार महाराष्ट्र भवन; १०० कोटींची तरतूद

मुंबईत कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांच्या निवासाची तात्पुरती सोय व्हावी यासाठी नवी मुंबई इथं महाराष्ट्र भवन उभारण्यात येणार असल्याची घोषणा अजित पवारांनी केली आहे. यासाठी १०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

गृह विभागासाठी १,८९२ कोटी रूपये

सैन्यदलाच्या धर्तीवर पोलीस उपचार रुग्णालय स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली असून गृह विभागासाठी १,८९२ कोटी रूपये नियतव्यय प्रस्तावित आहेत.

२०२५ पर्यंत ५००० चार्जिंग स्टेशन्स उभारण्याची घोषणा

राज्यामध्ये विद्युत वाहनांची संख्या वाढवण्याचे प्रस्तावित आहे. २०२५ पर्यंत ५००० चार्जिंग स्टेशन्स उभारण्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे.

कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांसाठी विशेष योजना

कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांसाठी पंडिता रमाबाई महिला उद्योजक योजनेची घोषणा, या महिलांना स्वयंरोजगरासाठी भांडवल उपलब्ध करून देणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे.

एसटी महामंडळासाठी ७ हजारहून अधिक कोटींची तरतूद

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी ४ हजार १०७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. महामंडळाला ३ हजार नव्या पर्यावरणपूरक बसगाड्या उपलब्ध करून दिल्या जातील. बसस्थानकांचा दर्जा सुधारण्यासाठी, त्यांच्या पुनर्बांधणीसाठी अर्थसाहाय्य उपलब्ध करून दिले जाईल. परिवहन विभागासाठी ३ हजार तीन कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालयासाठी १०० कोटींचा निधी

भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालयासाठी १०० कोटींचा निधी देण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे. तसंच राज्यातल्या महापुरुषांच्या मूळ गावातील शाळांना १ कोटीचा निधी उपलब्ध करून दिला जाईल.

घोषणा आणि त्यासाठी केलेली तरतूद अशी आहे …

राज्यात सीएनजी स्वस्त होणार. कर १३.५ टक्क्यांवरून ३ टक्क्यांवर

वस्तू व सेवा, केंद्रीय विक्री – १ लाख ५७ हजार ३०५ रुपये

रशिया युक्रेन युद्धाचा शेती, व्यवसायावर पडणार.

मुद्रांक शुल्काच्या दंडाच्या रकमेत सवलत देणार

सोने, चांदी उद्योग निर्यात आयात डिलिव्हरी कागदपत्रावरील कर माफ करणार

जलमार्गावरील बोटींवर प्रवास करणारे प्रवासी, सामानावर करामध्ये सूट

२४ हजार ३५३ कोटींच्या तुटीचा अर्थसंकल्प

अर्थव्यवस्थेची गती मंदावली असून या विकासाच्या पंचसूत्रीतून चालना देण्यात येईल.

राजर्षी शाहू महाराज १०० वी पुण्यतिथी – स्मारक निधी उपलब्ध

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा १२५ वा स्मृतीदिन नुकताच झाला.

फुलेवाडा विकास १०० कोटींची तरतूद

मराठी विभागाला – ५२ कोटी, सामान्य प्रशासन विभागाला – १०१ कोटी

डिजिटल व्यासपीठ उभारणार

ज्येष्ठ पत्रकार दरमहा योजना – ३५ कोटीवरून ५० कोटीवर

मराठी अभिजात भाषेचा दर्जा – विकास व संवर्धनासाठी १०० कोटी रुपये खर्चाचे मराठी भाषा भवन

चंद्रपूर-गडचिरोली वन्यजीवांना उपचारासाठी वन्यजीव बचाव केंद्र

पहिली ते आठवी पर्यावरण विषयाचा शालेय अभ्यासक्रम

पर्यावरण विभाग – २५३ कोटी रुपये

गडचिरोलीत पोलिस जवानांसाठी विशेष उपचार रुग्णालय

राष्ट्रीय छात्र सेनेतील विद्यार्थ्यांना पोलिस विभागात सहभाग वाढवण्यासाठी मासिक कमांडो भत्त्यात दुप्पट वाढ

अन्नधान्य ग्राहक विभाग – ३८५ कोटी रुपये

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना पोषक तांदूळ उपलब्ध

विधी व न्याय विभाग ५७८ कोटी रुपये

१४ कुटुंब न्यायालय स्थापन करण्यात येणार

गेट वे ऑफ इंडियावर मराठीमध्ये ध्वनीप्रकाशन कार्यक्रम

चंद्रपूर – विठ्ठल रुक्मिणी मंदिर – २५ कोटी निधी

छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले जागतिक वारस घोषित करण्यासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव

रायगड किल्ला परिसर विकास – १०० कोटी रुपये निधी

थोर समाजसुधारकांच्या कार्याची ओळख व्हावी यासाठी हेरिटेज वॉक (नागपूर, पुणे, मुंबई)

मुख्यमंत्री पेयजल योजना – ३ हजार ९२३ कोटी रुपये

जलजीवन मिशन कार्यक्रम – १ हजार ६०० कोटी

मदत व पुनर्वसन विभागाला कार्यक्रम खर्च ४६७ कोटी रुपये, मदत व इतर खर्च १० हजार ३५५ कोटी रुपये

कोरोनात मृत्यू झालेल्या नातेवाईकांसाठी ५० हजार रुपये अनुदान

आदिवासी समाज – नवद्योजकांना पायाभूत सुविधांसाठी आदिवासी औद्योगिक क्लस्टर

मुंबईत पारेषण प्रकल्प राबवण्यात येईल

स्वस्त वीजजोडणी प्रकल्प – ऊर्जा विभागाला ९ हजार ९२६ कोटी रुये

विधवा महिलांसाठी पंडिता रमाबाई महिला उद्योजक धोरण

नगरविकास विभाग ८ हजार ८०० कोटी रुपये

शिर्डी विमानतळ – १५० कोटी रुपयांचा निधी

अमरावती विमानतळ रात्रीची उड्डाणसेवा नवीन इमारत बांधकाम, गडचिरोलीत नवीन विमानतळ

सन २०२१ ते २०२५ महाराष्ट्र ईलेक्ट्रीक वाहन धोरण

विधवा झालेल्या महिलांना भांडवलाच्या कर्जाची १०० टक्के परतफेड

सार्वजनिक बांधकाम विभाग – १५ हजार ७०० कोटी रुपये, इमारती बांधकाम १ हजार ८८ कोटी रुपये

वसई, भाईंदर, ठाणे, बेलापूर जलमार्गाने जोडणार : ३३० कोटी रुपये खर्च

नाशिक पुणे रेल्वे प्रकल्पाचा ८० टक्के खर्च राज्य सरकार करणार

राज्यातील इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी १५७ टक्क्यांनी वाढली

सन २०२५ पर्यंत ५ हजार चार्जिंग स्टेशन उभारणार

एस्टी महामंडळ वेतन साठी ४१०७ कोटी दिले

३००० पर्यावरण पूरक नवीन बस गाड्या उपलब्ध करून देण्याचा मानस

गतिमान वाहतूक दळणवळण – ७ हजार ५०० कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी

पंतप्रधान ग्रामसडक योजना – ६ हजार ५०० किमी रस्त्यांच्या बांधकामांना सुरुवात करणार

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव याअंतर्गत राज्यातील १० गावांमधील शाळांची निवड करण्यात आली आहे.

महात्मा ज्योतिबा फुले यांचे मूळ गाव खानवाडी, ता. पुरंदर, पुणे

राजर्षी शाहू महाराजांचे जन्मगाव कागल, जिल्हा कोल्हापूर

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रवेश घेतलेली पहिली शाळा सातारा

लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे जन्मगाव वाटेगाव तालुका वाळवा, सांगली

महर्षी धोंडो केशव कर्वेंचे जन्मगाव मुरुड, ता. दापोली, जि. रत्नागिरी

साने गुरुजींचे जन्मगाव, पालगड, ता. दापोली, जि. रत्नागिरी

सावित्री फुले यांचे जन्मगाव नायगाव, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा

संत तुकडोजी महाराज यांचे जन्मगाव मोजरी, तिवसा, जिल्हा अमरावती

संत गाडगेबाबा यांचे जन्मगाव शेणगाव तालुका अंजनगाव, अमरावती

क्रांतीसिह नाना पाटील यांचे मूळगाव य़ेडेमच्छिंद्री, तालुका वाळवा, जिल्हा सांगली

या गावातील शाळांना शैक्षणिक सुधारणा करण्यासाठी प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल.

२२-२३ पाच लाख घरकुलांचं उद्दीष्ट

झोपडपट्टी – १०० कोटी निधी

पंतप्रधान नागरि आवास योजना – लाभर्थ्यांना ३ हजार ४०० कोटी

ग्रामविकास विभाग – ७ ७०० कोटी रुपये

पुणे रिंग प्रकल्पासाठी १ हजार ९०० हेक्टर जमीन अधीग्रहण – १ हजार ५०० कोटी

समृद्धी महामार्ग नागपूर ते भंडारा गोंदिया, नागपूर ते गडचिरोली विस्तारीकरण करणार आहे

गोसीखुर्द प्रकल्पासाठी ८५० कोटी रूपये उपलब्ध करून देणार

महिला शेतकऱ्यांसाठी कृषी योजनांमध्ये राखीव असलेली ३० टक्केची तरतूद आता वाढवून ५० टक्के केलेली आहे.

कोल्हापूर विद्यापीठ १० कोटी रुपये, मुंबई विद्यापीठ २ कोटी रुपये

लता मंगेशकर संगीत विद्यालयासाठी १०० कोटी निधी

स्टार्टअपला सुरुवातीचे भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी १०० कोटींचा स्टार्टअप फंड

जागतिक डिजिटल क्रांतीच्या युगात रोजगार क्षम मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी महसूल विभागाला ५०० कोटी रुपयांची तरतूद

सर्व योजना लाभार्थ्यांच्या आधार क्रमांकाशी जोडण्यात येतील.

५ हजार विद्यार्थ्यांना कौशल्य विकास आधारित प्रशिक्षण

होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सोयी मिळाव्या यासाठी राज्यसरकारचा निर्णय

मुंबई सेंट जॉर्ज पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था, नाशिक वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर आंबेडकर वैदकीय शिक्षण संस्था स्थापन करण्यात येणार आहे.

अन्न सुरक्षा चाचणी बळकटीकरण, प्रयोगशाळा सुधारणा २ कोटी खर्च

पुण्यात वैद्यकीय वसाहत उभारणार.

आरोग्य सुविधांवर ११ हजार कोटी रुपयांचा खर्च करणार

नांदेड, अमरावती, जालना, भंडारा, अहमदनगर, सातारा प्रत्येकी ५० खाटांची ट्रॉमा केअर युनिट स्थापन करण्यासाठी भांडवली खर्चसाठी १०० कोटी रुपये, आवर्ती खर्चासाठी १८ कोटी रुपये

अनेक जिल्ह्यांच्या ठिकाणी नवजात शिशू आणि माता यांच्यासाठी स्त्री रुग्णालये स्थापन करण्यात येतील

राज्यातील ५० खाटांपेक्षा जास्त क्षमता असलेल्या रुग्णालयांना वॉशिंग मशिन

मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी आधुनिक उपचार पद्धती ५९ रुग्णालयात सुरू करणार

८ मोबाईल कर्करोग मोबाईल व्हॅन – ८ कोटी रुपये खर्च

४९ रुग्णालयाची बांधकाम दुरुस्ती

जालन्यात नवीन मनोरुग्णालयासाठी ६० कोटी रुपये

देशी-गाई म्हशींची उत्पादकता वाढवण्यासाठी महाराष्ट्रात ३ फिरत्या प्रयोगशाळा

मत्सोद्योग विभाग , पशूसंवर्ध – ४०६ कोटी रुपये

मुंबईतील पशूवैद्यकीय रुग्णालयासाठी १० कोटी रुपयांचा निधी

येत्या २ वर्षात ११ सिंचनप्रकल्प पूर्ण करणार.

गोसीखुर्द प्रकल : ८५३ कोटी ४५ लाख रुपये निधी

जलसंपदा विभागाला १३ हजार ५५२ कोटी

उस्मानाबाद, गडचिरोलीमध्ये पाझर तलाव योजना

मृत व जलसंधारण विभाग – ३ हजार ५०० कोटी

कृषी पंप – ६० हजार वीजजोडणीचे उद्दीष्ट

महसूल विभागामार्फत शेळी समूह प्रकल्प राबवण्यात येईल

विदर्भ मराठवाड्यात कापूस उत्पादकता वाढवण्यासाठी मूल्यसाखळी विकासासाठी येत्या तीन वर्षात ३ हजार कोटींचा निधी

२२-२३ साठी कार्यक्रम खर्चासाठी कृषी विभागाला ३ हजार २५ कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित

महिला शेतकऱ्यांसाठी राखीव असलेली तरतूद ३० टक्क्यांवरून ५० टक्के

तरतुदीच्या तीन टक्के निधी आजी माजी सैनिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येईल

कृषि क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी भरीव तरतूद

नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांच्या दिलेल्या वचनाची पूर्ती या आर्थिक वर्षात करणार

अनुदानाचा लाभ २० लाख शेतकऱ्यांना

शेतकऱ्यांची कर्जमाफी करणाऱ्याचा सरकारचा निर्णय

शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज पुरविण्याच्यामुळे घोषणेमुळे पीककर्जात वाढ

मूल्य साखळी योजनेसाठी १ हजार कोटी रुपये

शेततळ्यात अनुदान ७५ हजार देणार, ५० टक्के वाढ केली

छत्रपती संभाजी महाराज स्मारक २५० कोटी

छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने महाराष्ट्र शौर्य पुरस्कार

एक ट्रिलियन डॉलर बजेट असणारे महाराष्ट्र पहिले राज्य बनेल

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -