पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. राज्यात भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर झाली. मात्र गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करुन निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मात्र, या दोन्ही पक्षांचा हिरमोड झाला आहे.
निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरील आकडेवारीनुसार शिवसेनेला 0.25% मतं मिळाली आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सध्या 1.06% मतं आहेत. सगळ्यात विशेष बाब म्हणजे नोटालाही या दोन्ही पक्षांपेक्षा जास्त मतं मिळाली आहेत. 1.17% मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय निवडला आहे.
भाजपला गोव्यात सर्वाधिक मतवाटा मिळाला असून त्यापाठोपाठ काँग्रेस, मगोप, आप, तृणमूल काँग्रेस, गोवा फॉरवर्ड पक्ष यांचा क्रमांक आहे.
पक्ष आणि मिळालेली मतं
- भाजप (33.60%)
- काँग्रेस (23.54%)
- महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष (8.60%)
- आप (6.78%)
- तृणमूल काँग्रेस (4.89%)
- नोटा (1.17%)
- गोवा फॉरवर्ड पक्ष (1.14%)
- राष्ट्रवादी (1.06%)
- शिवसेना (0.25%)
- इतर (18.98%)