मुंबई : पाच राज्यांच्या निवडणुका होत असताना उत्तर प्रदेश आणि गोवा या राज्यांमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांनीही आपले नशीब आजमावले होते. परंतु दोन्ही ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांचे डिपॉजिट जप्त झाले आहे. यावर भाजप नेते नितेश राणे यांनी गोवा आणि उत्तर प्रदेशातील निकालांवरुन खोचक टोला लगावला आहे.
Goa aur UP mein “Meow Meow” ki awaj nahi sunaee Di bhai..
Very sad..
bahut dukh hua!!— nitesh rane (@NiteshNRane) March 10, 2022
“गोवा आणि उत्तर प्रदेशात ‘म्याव-म्याव’चा आवाजच ऐकू आला नाही. खुपच वाईट, अत्यंत दु:ख झालं,” असं म्हणत नितेश राणेंनी खोचक टोला लगावला. त्यांनी यासंदर्भात एक ट्वीट केले आहे.
यापूर्वी नितेश राणे यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना पाहून ‘म्याव-म्याव’ असा आवाज काढला होता. त्यांच्या या कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियातून समोर आला होता. तसंच आपण आदित्य ठाकरे यांना पाहूनच आपण म्याव, म्याव केलं. कारण आधी वाघाची डरकाळी देणाऱ्या शिवसेनेची अवस्थाच म्याव, म्याव सारखी झाली आहे, असे नितेश राणे यांनी सांगितले होते.