Wednesday, July 3, 2024
Homeताज्या घडामोडीपंजाब वगळता अन्य चार राज्यात भाजपची मुसंडी

पंजाब वगळता अन्य चार राज्यात भाजपची मुसंडी

काँग्रेसला मोठा धक्का, पाचही राज्यात काँग्रेसचा सुपडा साफ

नवी दिल्ली : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती येऊ लागले आहेत. पंजाब वगळता अन्य चार राज्यांमध्ये भाजपचे उमेदवार आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. पंजाबमध्ये जनतेने काँग्रेसला नाकारल्याचे चित्र दिसत आहे. पंजाबमध्ये आम आदमी पार्टी तर उत्तर प्रदेशसह, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड या चार राज्यांमध्ये भाजपने चांगलीच मुसंडी मारली आहे. या चारही राज्यात भाजपला मोठी आघाडी मिळाली आहे.

राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे राज्य म्हणजे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा भाजपच सत्तेत आले आहे. तर विधानसभेच्या 40 जागा असलेल्या गोवा राज्यात देखील भाजप आघाडीवर आहे.

त्याचबरोबर उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये देखील भाजप आघाडीवर आहे. उत्तराखंडमध्ये विधानसभेच्या 70 जागा आहेत. यामध्ये 44 जागांवर भाजप आघाडीवर असल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे काँग्रेस 23 जागांवर आघाडीवर आहे. तर इतर 3 जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे उत्तराखंडमध्ये पुन्हा भाजपचीच सत्ता येण्याची शक्यता आहे.

तसेच मणिपूरमध्ये देखील भाजपने आघाडी घेतली आहे. मणिपूरमध्ये भाजपने 25 जागांवर आघाडी घेतली हे. तर काँग्रेस 14 जागांवर आघाडी आहे. एनपीएफ 11 जागांवर तर इतर 10 जागांवर आघाडीवर आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -