Tuesday, July 1, 2025

मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपा आमदारांची विधानभवनाच्या पाय-यांवर घोषणाबाजी

मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपा आमदारांची विधानभवनाच्या पाय-यांवर घोषणाबाजी

मुंबई : देशद्रोह्यांशी आर्थिक व्यवहार करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी राजीनामा देण्याच्या मागणीसाठी विरोधकांनी विधीमंडळाच्या पाय-यांवर बुधवारी सकाळी १०.३० वाजता आंदोलन केले.


यावेळी भाजपच्या आमदारांनी ‘नवाब मलिक यांना पाठीशी घालणा-या सरकारचा धिक्कार असो’, महाराष्ट्राचे सरकार दाऊद समर्थक आहेत का?, नवाब मलिक यांचे त्यागपत्र घ्या, अन्यथा खुर्च्या खाली करा’, अशा आशयाच्या घोषणा दिल्या.


आंदोलनाच्या वेळी भाजपच्या आमदारांनी नवाब मलिक आणि महाविकास आघाडी सरकार यांच्या विरोधातील फलक हातात घेतले होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप आमदार आशिष शेलार, आमदार श्वेता महाले, नमिता मुंदडा यांसह भाजपचे अन्य आमदार या आंदोलनात सहभागी झाले होते.

Comments
Add Comment