'उद्धव ठाकरे यांनी माझी कितीही चौकशी करावी'

मुंबई : शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत केंद्रीय तपास यंत्रणा, भाजप आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर घणाघाती आरोप केले. या आरोपांना सोमय्या यांनी उत्तर देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले आहे. आपण ज्या तक्रारी केल्या आहेत त्यांमध्ये तथ्य असल्यानेच त्यासंदर्भात कारवाई होत आली आहे. माझा राकेश वाधवान यांच्याशी कोणताही संबंध नसल्याचे सोमय्या यांनी म्हणत उद्धव ठाकरे यांना माझी कितीही चौकशी करावी, असे आव्हानच त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.


पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवान यांच्याशी किरीट सोमय्या यांचे आर्थिक संबंध काय आहेत, हे त्यांनी स्पष्ट करावे असेही राऊत यांनी म्हटले आहे. पीएमसी बँक घोटाळा, राकेश वाधवान एचडीआयएल पत्राचाळ भ्रष्टाचार चांगली गोष्ट आहे. पण मी एक प्रश्न विचारला की राकेश वाधवान यांच्याशी संबंध काय आहे हा प्रश्न विचारला होता. वसईतील जमिनीबाबतही एक मुद्दा उपस्थित केला होता तेथे सोमय्यांची वाधवान यांची थेट भागीदारी आहे. यावर आपला वाधवान यांच्याशी कोणताही संबंध नसल्याचे सोमय्या यांनी स्पष्ट केले आहे.


संजय राऊत यांनी आमच्यावर कितीही आरोप केले असले तरी त्या संदर्भात त्यांनी कोणतीही तक्रार केलेली नाही. किंवा त्यांनी आपल्या आरोपांबाबत कोणतीही कागदपत्रे दिलेली नाहीत, याकडे लक्ष वेधत सोमय्या यांनी राऊत करत असलेले आरोप निराधार असल्याचे सूचित केले आहे. ही त्यांची डायव्हर्जन टेक्निक असून अशा टेक्निकला आपण विचारत नाही. कितीही चौकशी करा, असे आवाहन किरीट सोमय्या यांनी केले आहे.


राऊत हे मला ईडीचा पाचवा एजंट म्हणत असले तरी ईडी असो, सीबीआय असो, उच्च न्यायालय असो वा, सर्वोच्च न्यायालय असो अशा सगळ्या ठिकाणी किरीट सोमय्या तक्रारी घेऊन जातात. तक्रारीत दम असतो म्हणून कारवाया केल्या जातात. न्यायालयात सोमय्या काही न्यायाधीश नाहीत. मी उद्धव ठाकरेंच्या १९ बंगल्याच्या मुद्द्यांवर प्रश्न विचारले होते. मग मुख्यमंत्री ठाकरे हे १९ बंगल्यांवर बोलण्याची का हिंमत दाखवत नाहीत, असा सवालही सोमय्या यांनी केला आहे.

Comments
Add Comment

Rain Update: मुंबईसह राज्यात पावसाची शक्यता; मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जनेसह सरी

मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाची

राज्यातील डॉक्टर आज संपावर !

मुंबई (प्रतिनिधी) : आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) पूर्ण केलेल्या

स्व. मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक

मुंबई: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी स्व. मीनाताई ठाकरे यांच्या दादर येथील

'वन राणी' टॉय ट्रेन पुन्हा सुरू होणार

मुंबई: चार वर्षांच्या खंडानंतर, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील मिनी टॉय ट्रेन "वन राणी" सप्टेंबरच्या अखेरीस

फडणवीस सरकारचा विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष व तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश

मुंबई मेट्रो स्टेशनवर आता तुमचा व्यवसाय सुरू करा! काय आहे ही योजना?

मुंबई: मुंबईतील उद्योजक, स्टार्टअप्स आणि व्यावसायिकांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. महा मुंबई मेट्रोने (MMMOCl)