Friday, July 11, 2025

'मातोश्री'च्या निकटवर्तीयांवर आयटीची धाड

'मातोश्री'च्या निकटवर्तीयांवर आयटीची धाड

मुंबई : शिवसेना उपनेते आणि स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाने धाड मारल्याची घटना ताजी असतानाच आता वादग्रस्त आरटीओ अधिकारी बजरंग खरमाटे, शिवसेनेचे युवा नेते व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मर्जीतील शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिर्डी देवस्थानचे विश्वस्त राहुल कनाल तसेच अनिल परब यांचे निकटवर्तीय संजय कदम यांच्या निवासस्थानी आयकर खात्याची छापेमारी सुरु आहे.


https://twitter.com/NiteshNRane/status/1501067637497167875

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि युवा सेनेचे पदाधिकारी राहुल कनाल यांच्या घरी आयकर विभागाने सकाळीच छापा मारला. ते शिर्डी देवस्थानचे विश्वस्त देखील आहेत. मुंबईत वांद्र येथील अल्मेडा इमारतीत राहुल कनाल यांचे निवासस्थान आहे. त्यांच्या मुंबईच्या या घरी ही छापेमारी करण्यात आली असून राहुल कनाल मातोश्रीचे निकटवर्तीय मानले जातात. आयकर विभागाचे अधिकारी मंगळवारी सकाळी सीआरपीएफ जवानांची सुरक्षाव्यवस्था घेऊन राहुल कनाल यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी पोहोचले आहेत. त्यानंतर अधिकाऱ्यांनी याठिकाणी तपासाला सुरुवात केली आहे.


https://twitter.com/NiteshNRane/status/1501066800939028482

भाजपा आमदार अतुल भातखळकर ट्विटरवर नेहमी सक्रीय असतात आणि शिवसेनेवर शरसंधान साधताना पाहायला मिळतात. आज सकाळी त्यांनी मुंबईत आयकर विभागाने कारवाई करण्यास सुरुवात केली असल्याचे ट्विट केले आहे. मुंबईत अंधेरी पश्चिमेला कुणावर तरी आयकर विभागाची कारवाई सुरू आहे. कोण असावा हा नवा बजरंग खरमाटे??, असे ट्विट आमदार अतुल भातखळकर यांनी केले आहे.


यासंदर्भात अधिक माहिती देताना त्यांनी आयकर विभाग संपूर्ण माहितीनिशी काम करत असते त्यामुळे यात राजकारण आणण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. जर तुम्ही काही चुकीचे केले नसेल तर घाबरण्याचे काहीच कारण नाही आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कायद्याने कारवाई होईलच, असे अतुल भातखळकर म्हणाले.


तर संजय मानाजी कदम हे शिवसेनेच्या अंधेरी पश्चिम मतदारसंघाचे संघटक आहेत. त्यांच्या घरी आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. एकाच दिवसात शिवसेनेशी संबंधित असलेल्या नेत्यांच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.


विशेष म्हणजे आज शिवसेना नेते संजय राऊत यांची दुपारी पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी तपास यंत्रणांचा भ्रष्टाचार उघड करणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्याआधीच अशा धाडी मारण्यात आल्यानंतर आता एकच खळबळ माजली आहे.


https://twitter.com/NiteshNRane/status/1501064255218798595

याबाबत आता नितेश राणे यांनी शिवसेनेला चिमटा काढणारं ट्विट करत म्हटलंय की, राहुल कनाल यांच्या घरावर आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. आमच्या 'आधिश'वर आणखी मोर्चा काढा. म्हणालो होतो की वक्त वक्त की बात है!

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा