दोन वर्षानंतर मुंबई आणि राज्यात पुन्हा एकदा कार्यक्रम, समारंभ आणि सोहळे यांना उधाण आले आहे. सर्वत्र उत्साह आणि गर्दी पुन्हा एकदा दिसू लागली आहे. बाजाररपेठा पुन्हा एकदा गर्दीने गजबजून गेल्या आहेत. कोरोनाच्या संकटावर मात केली याचा आनंद सर्वांना आहेच पण गेली दोन वर्षे असलेल्या निर्बधांच्या चौकटतून आता सुटका झाली आहे याचे सर्वसमान्य जनतेला मोठे समधान आहे. वाढदिवस लग्नकार्य, स्नेहसंमेलने, मेळावे यावरील बंदीची बेडी आता सैल झाली आहे. पुन्हा एकदा सार्वजनिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू झाली आहे. अशा उत्साहात यावर्षीचा महिला दिन साजरा होत आहे. आठ मार्च, ला दरवर्षी जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. लहान मोठया गावांपासून मोठे मोठ्या शहरांपर्यंत सर्वत्र महिला दिनाचे कार्यक्रम साजरे होत आहेत. यंदा तर महिला दिनाचे कार्यक्रम अगोदरपासूनच सुरू झाले किंबहुना आठवडाभर तर महिला दिनाचे कार्यक्रम साजरे केले जात आहेत. महिलांविषयी आदर, महिलांचे हक्क, महिलांचा सन्मान याविषयी अशा कार्यक्रमातून जागृती होत असते आणि तसे होणेही गरजेचे आहे. महिला दिन हा काही केवळ सरकारी पातळीवर साजरा होत नाही तर स्थानिक पातळीवर राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, मिडियासुध्दा महिला दिन साजरा करण्यात आघाडीवर आहे. दैनिक प्रहारच्या वतीने प्रहार महिला संवाद असा अनोखा कार्यक्रम आम्ही मुंबईच्या कार्यालयात योजला होता. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा नि कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या महिलांनी सहभाग घेतला आणि प्रहारच्या टीमबरोबर मनमोकळा संवाद साधला. या कार्यक्रमाचा वृत्तांत आम्ही प्रहारमधे देत आहोतच. पण या कार्यक्रमच्या निमित्ताने महिलांमधेही स्पर्धत उतरण्याची आणि मिळालेल्या संधीचे सोने करून दाखविण्याची कशी इच्छा व धमक असते हे त्यांच्याकडूनच ऐकायला मिळाले. महिला सक्षमिकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रार्ष्ट्रीय स्तरावर अनेक उपक्रम राबिवले आहेत. उज्जवला ग’स योजना हे त्याचे मोठे उदाहरण आहे. बेटी बचाव बेटी पढाव हा पंतप्रधानांचा संदेश आज देशभरात अगदी लहान सहान गावातही घराघरात पोचलेला बघायला मिळतो. महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले पाहिजे व त्यांना सुरक्षा, सन्मान आणि विश्वास मिळाला पाहिजे अर्थातच याची जबाबदारी संपूर्ण समाजाची आहे. केवळ महिला दिनाला एक दिवस महिलांना महत्व देणे म्हणजे महिला दिन सफल झाला असे नव्हे. बारा महिने चोवीस काळ महिलांना सुरक्षा व सन्मान प्राप्त झाला पाहिजे.
महिला दिनाला जनतेकडून मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे. विविध संस्था व संघटनाच्यावतीने महिला दिनाचे अभिनव कार्यक्रम योजले जात आहेत. अशा वेळी महिला दिन हा उत्सव म्हणून साजरा होऊ लागला आहे. अशा उत्सवाला कोणाचा विरोध असण्याचे कारण नाही पण महिला दिन केवळ मोर्केटींग किंवा इव्हेंट एवढ्यापुरताच मर्यादीत राहता कामा नये. घरी दारीच नव्हे तर कार्यालयात, रेल्वे, बसमधे किंवा सार्वजनिक ठिकाणी महिलांना सुरक्षा, आदर व सन्मान सर्वत्र मिळाला पाहिजे. घरात स्त्री नसेल तर घराला घरपण येऊ शकत नाही. याचे भान प्रत्येक पुरूषाने ठेवले पाहिजे. आई, आजी, मुलगी, पत्नी, सून, वहिनी. मावशी, मामी अशी जी नाती निर्माण होतात ती एकास्रीमुळेच याचा विसर पडता कामा नये. आज सर्व क्षेत्रात महिला आपले कर्तृत्व गाजवताना दिसतात. बस चालक आणि वाहक, ट’क्सी आणि आ’टो रिक्षा चालक, अगदी वैमानिकही महिला आहेतच. मोठमोठ्या का’र्पोरेट कंपन्यांमधे उच्चपदांवरही महिलाजबाबदारीची कामे पार पाडत आहे. भारतीय सै्न्य दलात वराष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतही महिलांना प्रवेशासाठी दरवाजे खुले झाले आहेत. पुरूषांच्या बरोबरीने महिला जिद्दीने व हिम्मतीने काम करताना दिसतात. महिला जशा कार्यक्षम आहेत तसेच संवेदनशील असतात. म्हणूनच घर असो किंवा आपल्या कामावरील जबाबदारी असो त्या यशस्वीपणे पेलून दाखवतात.
नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधे निर्मला सीतारामन या अर्थमंत्री आहेतच, यापुर्वी संरक्षण मंत्रालयाची सूत्रेही मोदींनी महिलेकडे सोपवली होती. स्मृती इराणी यांनीही आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. आज सुषमा स्वराज हयात नाहीत पण त्यांनी केंद्रीय मंत्री म्हणून केलेले काम किंवा भारतीय जनता पक्षासाठी संघटना बांधणीचे केलेले काम कधीच विसरता येणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांमधे अनेक पदांवर महिला कार्यक्षमपमे काम करताना दिसत आहेत. मुंबईचे महापौरपद किशोरी पेडणेकरांकडे तर सिंधुदूर्ग जिल्हा परिषदेचे अदध्यक्षपद संजना सावंत यांच्याकडे आहे. संजना सावंत यांच्या त्यांच्या सार्वजनिक कामाबद्दल नुकताच मोठा सन्मान करणारा पुरस्कारही लाभला. सुप्रिया सुळे, नवनीत राणा, आदिती तटकरे, चित्रा वाघ अशा अनेक महिलांनी सार्वजनिक जीवनात आपल्या कामाचा ठसा उमटला आहे. न्यायव्यवस्थेत आणि पोलीस दलातही महिला मोठमोठ्या पदावर सक्षमपणे काम करीत आहेत. सामान्य व मध्यमवर्गीय घरातील महिलांचाही गृहिणी नव्हे तर हिरकणी असा सन्मान होऊ लागला आहे ही आनंदाची बाब आहे. महिलांना उच्च शिक्षण. प्रशिक्षण आणि निरोगी आरोग्य लाभावे यासाठी आणखी प्रयत्न करण्याची गरज आहे. महिला दिनानिमित्त प्रहार परिवाराच्यावतीने सर्व माता भगिनींना मन:पूर्वक शुभेच्छा.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…