Monday, July 15, 2024
Homeक्रीडाभारतासाठी ‘सुपर संडे’

भारतासाठी ‘सुपर संडे’

महिला वर्ल्डकप; भारताची पाकिस्तानवर १०७ धावांनी मात

माउंट माँगानुइ (वृत्तसंस्था) : भारताच्या क्रिकेटसाठी ६ मार्च ‘सुपर संडे’ ठरले. न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या आयसीसी विश्वचषक (वनडे) क्रिकेट स्पर्धेत भारताच्या महिलांनी पाकिस्तानवर विजय मिळवला. पुरुष संघाने श्रीलंकेला लोळवले. मोहालीमध्ये झालेली पहिली कसोटी तिसऱ्या दिवशीच एक डाव आणि २२२ धावांनी जिंकत दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

महिला वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारतीय महिलांनी सांघिक कामगिरी करताना पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. त्यात पूजा वस्त्रकारसह (६७ धावा) अष्टपैलू स्नेह राणा (नाबाद ५३ धावा आणि २ विकेट), स्मृती मन्धाना (५२ धावा) तसेच राजेश्वरी गायकवाड (विकेट) यांचे मोलाचे योगदान राहिले. रविवारच्या विजयासह भारताने वर्ल्डकप स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धची अपराजित मालिका कायम राखली. तसेच एकूण सलग विजयांची संख्या ११वर नेली.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील पुरुष संघाला पहिली कसोटी जिंकण्यात फारसे प्रयास पडले नाहीत. फॉलोऑन लादलेल्या श्रीलंकेचा दुसरा डाव रविवारी १७८ धावांमध्ये आटोपला आणि प्रतिस्पर्ध्यांचा अवघ्या तीन दिवसांत खेळ खल्लास झाला. १७५ धावांची नाबाद खेळी करण्यासह सामन्यात नऊ विकेट घेणारा अष्टपैलू रवींद्र जडेजा मॅचविनर ठरला.

परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर १०७ धावांनी मात करताना भारताच्या महिला क्रिकेटपटूंनी आयसीसी वर्ल्डकप स्पर्धेची दिमाखात सुरुवात केली.

भारताचे २४५ धावांचे आव्हान प्रतिस्पर्ध्यांना पेलवले नाही. पाकिस्तानचा डाव ४३ षटकांत १३७ धावांमध्ये आटोपला. वनडे क्रिकेटमध्ये भारताचा हा पाकिस्तानवरील सलग ११वा विजय आहे. पूजा वस्त्रकारसह (६७ धावा) अष्टपैलू स्नेह राणा (नाबाद ५३ धावा आणि २ विकेट), स्मृती मन्धाना (५२ धावा) तसेच राजेश्वरी गायकवाड (विकेट) यांचे मोलाचे योगदान राहिले. रविवारच्या विजयासह भारताने वर्ल्डकप स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धची अपराजित मालिका कायम राखली.

प्रत्युत्तराखल मैदानात उतरलेल्या पाकिस्तानला सलामीवीर सिद्रा अमीन व जवेरिया खान यांनी सावध सुरुवात करून दिली. मात्र, त्यांना ११ षटकांत केवळ २८ धावा जमवता आल्या. राजेश्वरी गायकवाडने जवेरिया खानला (११) बाद करताना पाकिस्तानला पहिला धक्का देताना दिला. तिच्यासह भारताचे सर्वच गोलंदाज टिच्चून मारा करताना धावांवर चाप लावून ठेवताना दिसले. त्यामुळे पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंवरील दडपण वाढले. दीप्ती शर्मा व स्नेह राणा यांनी अनुक्रमे कर्णधार बिश्माह मरूफ (१५) व ओमाइमा सोहैल (५) यांची विकेट घेतली. अमीन एका बाजूने संघर्ष करत होती. पण, भारताची अनुभवी मध्यमगती गोलंदाज ३४ वर्षीय झुलन गोस्वामीने तिला बाद केले.

झुलनने अमीन (३) व निदा दार (४) यांना माघारी पाठवून पाकिस्तानची अवस्था ५ बाद ७० अशी केली. राजेश्वरी गायकवाडने आलिया रियाझला (११) यष्टिचीत केले. तिने सातत्यपूर्ण कामगिरी करताना ३१ धावांत ४ विकेट घेतल्या. झुलनला दोन विकेट मिळाल्या.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना अडीचशेच्या घरात झेप घेतली तरी पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताची अवस्था ६ बाद ११४ अशी केली होती, परंतु पूजा वस्त्राकर व स्नेह राणा यांनी विश्वविक्रमी भागादारी करून पाकिस्तानसमोर तगडं आव्हान उभे केले. धडाकेबाज सलामीवीर शफाली वर्मा खाते न उघडता माघारी परतली.

तिसऱ्या षटकात पहिला धक्का बसल्यानंतर स्मृती मन्धाना व दीप्ती शर्मा यांच्या ९२ धावांच्या भागीदारीमुळे भारताने कमबॅक केले. दीप्ती ४० धावांवर माघारी परतली. त्यानंतर स्मृती ही ७५ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह ५२ धावांवर बाद झाली. १ बाद ९६ अशा मजबूत स्थितीत असणाऱ्या भारताची अवस्था ६ बाद ११४ अशी झाली. हरमनप्रीत कौर (५), कर्णधार मिताली (९) व रिचा घोष (१) यांचे अपयश भारताला महागात पडणार असे वाटत असताना पूजा वस्त्राकर आणि स्नेह राणा यांनी सातव्या विकेटसाठी ९७ चेंडूंत १२२ धावांची भागीदारी करताना भारताला ७ बाद २४४ धावा अशी मोठी धावसंख्या गाठून दिली. महिला वर्ल्डकप स्पर्धेतील ही सातव्या विकेटसाठीची सर्वोत्तम भागीदारी ठरली. पूजाने ५९ चेंडूंत ८ चौकारांसह ६७ धावा केल्या. स्नेह राणा ही ४८ चेंडूंत ५३ धावांवर नाबाद राहिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -