Wednesday, July 3, 2024
Homeक्रीडामुंबईचा पहिला सामना दिल्लीशी

मुंबईचा पहिला सामना दिल्लीशी

सर्वच्या सर्व सामने महाराष्ट्रात; आयपीएलचे वेळापत्रक जाहीर

मुंबई (वृत्तसंस्था) : आयपीएल २०२२चे वेळापत्रक रविवारी जाहीर करण्यात आले. आधी जाहीर केल्याप्रमाणे गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्समध्ये २६ मार्चला सलामीची लढत होणार असली तरी सर्वांची उत्सुकता लागून राहिलेल्या माजी विजेता मुंबई इंडियन्सचा पहिला सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध २७ मार्च रोजी ब्रेबर्न स्टेडियमवर रंगेल. यंदाच्या हंगामातील सर्वच्या सर्व ७० सामने महाराष्ट्रात होतील.

आयपीएल २०२२ स्पर्धा ही २६ मार्च ते २९ मे २०२२ या कालावधीत होईल. मुंबईत वानखेडे स्टेडियमवर २० तर ब्रेबर्न स्टेडियमवर १५ मॅच होतील. नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर २० आणि पुण्याच्या एमसीए इंटरनॅशनल स्टेडियमवर १५ मॅच होतील.

यंदाच्या आयपीएलमध्ये दहा टीम आहेत. प्रत्येक टीम चौदा लीग मॅच खेळेल. लीग मॅचच्या फेरीतून सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या चार टीम प्ले ऑफ राउंडमध्ये दाखल होतील.

यंदाच्या आयपीएलमध्ये प्रत्येक टीमला इतर नऊ पैकी पाच टीमसोबत दोन वेळा तर चार टीमसोबत एकदा लीग मॅच खेळावी लागेल.

प्रत्येक सहभागी टीम चौदा मॅच खेळेल. प्रत्येक टीमच्या चौदा पैकी प्रत्येकी चार मॅच या वानखेडे आणि डी. वाय. पाटील स्टेडियमवर तर प्रत्येकी तीन मॅच या ब्रेबर्न आणि एमसीए इंटरनॅशनल स्टेडियमवर होतील.आयपीएल स्पर्धेच्या सोयीसाठी दहा टीमना ग्रुप ए आणि ग्रुप बी अशा दोन गटांमध्ये विभागले आहे. आधीच्या आयपीएलच्या सर्व हंगामांचा विचार करून ग्रुपमधील संबंधित टीमचे स्थान निश्चित केले आहे. लीग राउंडमध्ये दोन्ही ग्रुपमधील सर्व टीम आपापल्या ग्रुपमधील इतर चार टीम विरुद्ध प्रत्येकी दोन लीग मॅच खेळतील. ग्रुपमध्ये निवडीच्या वेळी पहिल्या स्थानी असलेली टीम दुसऱ्या ग्रुपमधील पहिल्या स्थानावरील टीमसोबत तर ग्रुपमध्ये दुसऱ्या स्थानी असलेली टीम प्रतिस्पर्धी ग्रुपमधील दुसऱ्या स्थानावरील टीमविरुद्ध दोन मॅच खेळेल आणि इतर टीम विरुद्ध एक-एक मॅच खेळेल. हे सूत्र वेळापत्रकासाठी वापरले आहे.

अ गट – मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स, लखनऊ सुपर जायंट्स.

ब गट – चेन्नई सुपरकिंग्स, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्ज, गुजरात टायटन्स.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -