Saturday, July 5, 2025

नागपूरात हवाला व्यापाऱ्याकडे मिळाले कोट्यवधींचे घबाड

नागपूरात हवाला व्यापाऱ्याकडे मिळाले कोट्यवधींचे घबाड

नागपूर : नागपूर येथील एका फ्लॅटवर पोलिसांनी छापा टाकून तेथून ४ कोटी ३० लाख रुपये जप्त केले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तीन हवाला व्यापाऱ्यांना अटक केली आहे. रक्कम इतकी मोठी होती की मोजणीसाठी पोलिसांना मशीन मागवावी लागली. या कारवाईनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे.


गोंदियातील हवाला व्यावसायिक कोट्यवधींची रोकड घेऊन नागपुरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर नागपूरचे परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अपार्टमेंटमध्ये छापा घालत. या कारवाईत पोलिसांनी ४ कोटी ३० लाख रुपये जप्त केले आहेत. नेहाल सुरेश वडालिया (वय ३८, रा. कोतवाली), वर्धमान विलासभाई पच्चीकार (वय ४५) आणि शिवकुमार हरीशचंद दिवानीवाल (वय ४५, दोघेही रा. गोंदिया) अशी अटक केलेल्या हवाला व्यापाऱ्यांची नावे आहेत.

Comments
Add Comment