Tuesday, July 16, 2024
Homeताज्या घडामोडीरशियाचा मेजर जनरल युक्रेनमध्ये ठार

रशियाचा मेजर जनरल युक्रेनमध्ये ठार

मॉस्को : युक्रेनवर हल्ले सुरु करण्याच्या घटनेस आता आठ दिवस लोटले आहेत. या आठ दिवसांत रशियाला जबर नुकसान सहन करावे लागले असून युक्रेनच्या मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले आहे. अशातच रशियन सैन्याला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. युक्रेनमध्ये सैन्याचे नेतृत्व करण्यासाठी गेलेल्या मेजर जनरलचा मृत्यू झाला आहे.

रशियाचे मेजर जनरल आंद्रेई सुखोवत्स्की यांचा युक्रेनने केलेल्या प्रत्युत्तरात मृत्यू झालाचा दावा न्यूज एजन्सी NEXTA ने केला आहे. तसेच युक्रेनने रशियन सैन्याला जोरदार नुकसान पोहोचविल्याचा दावाही करण्यात आला आहे. KyivPost नुसार युद्धाच्या आठव्या दिवशी रशियाची 30 लढाऊ विमाने, 374 ऑटो मोबाइल्स टेक्निक्स, 42 MLRS, 900 AFV, ३१ हेलिकॉप्टर, 90 आर्टिलेरियन सिस्टम, 2 कटर, 217 टैंक, 11 एंटीएयर डिफेंस, 3 यूएवी उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. तसेच आतापर्यंत ९००० रशियन सैनिकांना मारल्याचा दावा देखील केला आहे.

रशियाच्या हल्ल्यामुळे दहा लाखांहून युक्रेनी नागरिकांनी पलायन केले आहे तर २२७ लोक मारले गेल्याचे युएनने म्हटले आहे. युक्रेनविरुद्ध सुरू असलेले युद्ध संपवण्यासाठी मॉस्को चर्चा करण्यास तयार आहे, असे रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी म्हटले आहे. रशिया युक्रेनच्या लष्करी पायाभूत सुविधांना लक्ष्य करणे थांबवणार नाही, असेही लव्हरोव्ह यांनी म्हटले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -