Monday, June 30, 2025

'दाऊद के दलालों को… जूते मारो सालों को'

'दाऊद के दलालों को… जूते मारो सालों को'

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून ठाकरे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी भाजपाच्या नेत्यांनी हातामध्ये अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याचे बॅनर धरुन घोषणाबाजी केली. ‘दाऊदच्या दलाल मंत्र्यांचा राजीनामा घ्या’, ‘महाराष्ट्राचे सरकार दाऊदचे समर्थक आहे का?’ अशी वाक्य या बॅनरवर लिहिण्यात आली होती.


‘दाऊद के दलालो को… जूते मारो सालों को,’ ‘नवाब मलिक कौन है?… दाऊद का दलाल है…’ अशा घोषणा यावेळी भाजपाच्या आमदारांनी दिल्या. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यासहीत भाजपाचे इतर अनेक आमदार उपस्थित होते.

Comments
Add Comment