Friday, May 9, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

मुंबईचे आयुक्त संजय पांडे करणार लोकांशी थेट संवाद; शेअर केला पर्सनल फोन नंबर

मुंबईचे आयुक्त संजय पांडे करणार लोकांशी थेट संवाद; शेअर केला पर्सनल फोन नंबर

मुंबई : मुंबईच्या पोलिस आयुक्त पदावर संजय पांडे यांनी त्यांच्या पदाचा पदभार स्विकारला आणि त्याबरोबरच सोशल मिडियाच्या माध्यमातून पहिली पोस्ट करत मुंबईकरांना सुरक्षेची हमी देत स्वतःचा पर्सनल फोन नंबर देखील शेअर केला आहे.


त्यांनी फेसबुकवर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, माझ्या प्रिय मुंबईकरांनो.. तुमचा पोलिस आयुक्त होणे ही माझ्यासाठी गौरवाची बाब आहे. मी ही पहिली पोस्ट अत्यंत नम्रतेने आणि जबाबदारीच्या भावनेने लिहित असल्याचे देखील त्यांनी म्हटले.


त्यांनी फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टमध्ये ते म्हणाले की, "काल मी पदभार स्वीकारला, मी गेली 30 हून अधिक वर्षे मुंबईत घालवली आहेत आणि मुंबई पोलिसात विविध पदांवर काम केले आहे. काही जण मला माझ्या 1992-93 मधील धारावीतील दिवसांपासून तर काही मी 1996-1997 मध्ये आर्थिक गुन्ह्यांचे नेतृत्व केले तेव्हापासून ओळखत असतील. माझी मुंबईशी ओळख असली तरी, ज्या दिवसांपासून मी मुंबईत काम केले त्या दिवसांपासून पोलिसिंग बदलली आहे. आणि हे लक्षात घेऊनच, मुंबई शहरात सर्वांसाठी सुरक्षा आणि सुरक्षितता राखण्याचे काम करण्यासाठी मी तुमचा पाठिंबा मिळवण्यासाठी तुमच्याशी संवाद करत आहे."


पांडे इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी पुढे लिहीले की, "मी माझा वैयक्तिक फोन नंबर 9869702747 शेअर करत आहे. तुम्ही नेहमी माझ्याशी WhatsApp/टेक्स्ट मेसेज तसेच फेसबुक https://www.facebook.com/profile.php?id=100066410464886 किंवा Twitter @sanjayp_1 वर संपर्क साधू शकता. सूचना मोठ्या किंवा लहान सर्वांचे स्वागत आहे. मी शक्य तितक्या सर्व संदेशांना प्रतिसाद देईन. आम्ही Facebook वर आठवड्यात कोणते काम करत आहोत तेही मी तुमच्यासोबत शेअर करेन."


ते पुढे म्हणाले की मी तुमच्याकडून गोष्टी ऐकण्यास उत्सुक आहे आणि मुंबईतील ‘safety and security to all’ या आमच्या ब्रीदवाक्यासाठी काम करेन."


संजय पांडे हे 1986 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. पांडे हे पोलिस महासंचालक असताना हायकोर्टाच्या निर्णयामुळे त्यांना पायउतार व्हावे लागले होते. मात्र, महाविकास आघाडी सरकारने पांडे यांना पोलीस आयुक्त या पुन्हा डीजी दर्जाच्या पदावर बसवून त्याचे पुर्नवसन केले आहे. पांडे हे जुलैमध्ये निवृत्त होणार असून पुढील सहा महिने ते मुंबई पोलीस आयुक्तपदावर कार्यरत असतील.

Comments
Add Comment