Friday, May 9, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

राज्य सरकारची नवी कोरोना नियमावली जाहीर

राज्य सरकारची नवी कोरोना नियमावली जाहीर

मुंबई : राज्य सरकारने कोरोना प्रतिबंधात्मक बंधने शिथिल करत नवी नियमावली जाहीर करत राज्यातील जनतेला दिलासा दिला आहे. ही नवी नियमावली ४ मार्चपासून लागू केली जाणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. नव्या नियमावलीनुसार राज्यातील १४ जिल्ह्यांमधील नाट्यगृहे, सिनेमागृहे, पर्यटन स्थळे आणि धार्मिक स्थळे १०० टक्के क्षमतेने सुरू करण्यात येत आहेत. तर राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये मात्र मनोरंजन स्थळे आणि पर्यटन तसेच धार्मिक स्थळे ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार आहेत.


यामुळे मुंबई शहर, मुंबई उपनगरे, पुणे, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, नागपूर, वर्धा, सातारा, सांगली, गोंदिया, चंद्रपूर, कोल्हापूर आणि भंडारा या १४ जिल्ह्यांना दिलासा मिळाला आहे.


शिथिल करण्यात आलेल्या जिल्ह्यांमध्ये सिनेमा हॉल, बार-रेस्टॉरंट, स्पोर्ट कॉम्प्लेक्स, जिम, स्पा, स्विमिंग पूल, धार्मिक स्थळ, नाट्य गृह, पर्यटन स्थळ, मनोरंजन पार्क आदी ठिकाणे 100 टक्के क्षमतेसह सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. इतर जिल्ह्यात 50 टक्के क्षमतेची अट कायम राहणार आहे.

Comments
Add Comment