Friday, May 9, 2025

महामुंबईताज्या घडामोडीठाणे

ठाणे जिल्हा वकील संघटनेची ५ मार्चला निवडणूक

ठाणे जिल्हा वकील संघटनेची ५ मार्चला निवडणूक

ठाणे : दर दोन वर्षांनी होणारी मात्र कोरोनामुळे लांबणीवर पडलेली ठाणे जिल्हा वकील संघटना पदाधिकारी निवडणूक येत्या ५ मार्च रोजी होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आधीच जोरदार प्रचार प्रक्रिया सुरू आहे. ठाणे जिल्हा वकील संघटना पदाधिकारी निवडणुकीत अध्यक्ष, सदस्यांसह २३ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. निवडणुक ५ मार्च या एकाच दिवशी पार पडणार आहे. निवडणुकीत एकूण १३५० वकील मतदार आहेत.


निवडणूक कार्यक्रम पुढील प्रमाणे : मतदान बार रूम, कोर्ट नाका, ठाणे येथे ५ मार्च रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५:३० या वेळेत आणि त्याच दिवशी संध्याकाळी मतमोजणी, निवडणुकीचा निकाल लागणार आहे.


ठाणे जिल्हा वकील संघटना पदाधिकारी निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून अध्यक्ष पदासाठी प्रशांत कदम, मधुकर पाटील. उपाध्यक्ष पदासाठी हेमलता देशमुख, सुधाकर पवार, सुभाषचंद्र सिंह, सचिव पदासाठी नरेंद्र गुप्ते, भाऊ हाडवले, सुनिल लसने, खजिनदार पदासाठी अनिल जोशी, विजय वाजगे, सहसचिव पदासाठी शांताराम देवरे, हेमंत म्हात्रे, सहसचिव महिला पदासाठी स्नेहल कासार, रुपाली म्हात्रे, समिती सदस्य सरीता बंद्रे, विकास जोशी, संतोष कुमार पांडे, अनिल पवार, गणेश पुजारी, उपेक्षा शेजवाल, रुपाली शिंदे, राजाराम तारमळे, सायली वलामे, असे २३ उमेदवार निवडणुकीसाठी रिंगणात आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून. ॲड. मुनीर अहमद काम पाहणार आहेत.

Comments
Add Comment