Thursday, June 19, 2025

खार्कीव्हमधल्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

खार्कीव्हमधल्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

खार्कीव्ह : युक्रेनमधील खार्किव येथे आज सकाळी झालेल्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. मंत्रालय या विद्यार्थ्याच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहे.


राजधानी कीवसह अन्य महत्त्वाच्या शहरांकडे होणाऱ्या रशियन सैन्याच्या घोडदौडीचा वेग कमी करण्यात युक्रेनच्या सैन्याला काही प्रमाणात यश आले असले तरी रशियाच्या रॉकेट हल्ल्यात सोमवारी खार्कीव्ह शहरात ११ नागरिक ठार झाले आणि मालमत्तेची मोठी पडझड झाली.


राजधानी किव्हनंतर सर्वात महत्वाचं शहर असणाऱ्या खार्कीव्हच्या मुख्य सरकारी इमारतीवर रशियाने बॉम्ब फेकला. हा सर्व प्रकार कॅमेरामध्ये कैद झाला आहे.


दरम्यान, युक्रेन आणि रशिया यांच्यातील चर्चेची पहिली फेरी कोणत्याही निष्कर्षांविना संपली असून आता लवकरच दुसऱ्या फेरीची शक्यता आहे.


रशिया आणि युक्रेनमधील उच्चायुक्त पातळीवरील ही चर्चा बेलारूसच्या सीमेवर झाल्याचे वृत्त आहे. या चर्चेतून फारसे काही निष्पन्न झाले नसले तरी लवकरच चर्चेची दुसरी फेरी ‘त्वरित युद्धविराम आणि युक्रेनमधून रशियन सैन्याची माघार हा युक्रेन आणि रशिया यांच्यातील शांतता चर्चेचा मुख्य उद्देश आहे’, असे युक्रेनच्या अध्यक्षीय कार्यालयाने सोमवारी स्पष्ट केले होते.

Comments
Add Comment