युक्रेनमध्ये अडकलेल्या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी शरद पवारांची परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा


मुंबई : युद्धग्रस्त युक्रेनमध्ये हजारो विद्यार्थ्यांसह भारतीय अडकले आहेत. त्यांना मायदेशात आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. राज्यातील अनेक नेते आणि मंत्रीही युक्रेनमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहेत. अनेक पालकांनी नेत्यांशी संपर्क साधून आपल्या पाल्यांना युक्रेनमधून सुखरूप मायदेशात आणावं अशी विनंती केली आहे. आता या विद्यार्थ्यांच्या आणि नागरिकांच्या सुटकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्वतः पुढाकार घेतला आहे. त्यांनी यासंदर्भात परराष्ट्र मंत्र्यांसोबत फोनवरून चर्चा केली आहे. रोमानिया-पोलंड सीमेवर अडकलेल्या विद्यार्थ्यांना मदत पुरवण्यासंदर्भातही त्यांनी चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे.


रशियाकडून युक्रेनवर हल्ले सुरूच आहेत. युक्रेनमधील महत्वाच्या शहरांना लक्ष्य केले जात आहे. रशियानं कीव्हसह अनेक शहरं उद्ध्वस्त केली आहेत. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत साडेतीनशेहून अधिक युक्रेनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे, त्यात काही लहान मुलांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. युक्रेनच्या गृह मंत्रालयाकडून हा दावा करण्यात आलेला आहे. या हल्ल्यांमध्ये जवळपास १६८४ जण जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे. हा आकडा वाढू शकतो, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.


युद्धभूमी युक्रेनमध्ये भयंकर परिस्थिती असून, या देशातील विविध शहरांमध्ये हजारो भारतीय अडकले आहेत. त्यात विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. त्यांना भारतात आणण्याचे प्रयत्न केंद्र सरकारकडून सुरू आहेत. केंद्र सरकारने 'ऑपरेशन गंगा' हाती घेण्यात आले आहे. युद्धजन्य परिस्थितीत भारताने युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशात आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. भारतीयांना घेऊन पाचवे विमान मायदेशी परतले आहे. आतापर्यंत अकराशेहून अधिक भारतीय मायदेशी परतले आहेत. अद्याप अनेक जण तिथेच अडकले असून, त्यांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रातील हजारो नागरिक आणि विद्यार्थी युक्रेनमधील विविध भागांत अडकले आहेत. त्यांच्या पालकांकडून राज्यातील नेत्यांशी संपर्क साधला जात असून, मुलांना परत आणावे अशी विनंती केली जात आहे. त्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दखल घेतली असून, त्यांनी स्वतः युक्रेनमधील भारतीयांच्या सुटकेसाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्याशी फोनवरून यासंदर्भात चर्चा केली. युक्रेनच्या खार्किव्हमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटकेसंदर्भात त्यांच्यात चर्चा झाली. बेलगोरोड (रशिया) मार्गे त्यांना भारतात आणण्याबाबतही चर्चा झाल्याचे कळते. रोमानिया-पोलंड सीमेवर अडकलेल्या विद्यार्थ्यांना मदत पुरवण्यासंदर्भातही चर्चा झाली, असे ट्वीट एएनआय या वृत्तसंस्थेने केले आहे.

Comments
Add Comment

लाल किल्ला स्फोट प्रकरणी एनआयएच्या तपासातून हाती आली धक्कादायक माहिती, २०२३ पासूनचा दहशतवाद्यांचा कट उघड

नवी दिल्ली : दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्याबाहेर झालेल्या कार स्फोटाच्या तपासात महत्वाची माहिती समोर आली

प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुले हवीतच; चंद्राबाबू नायडूंचं विधान चर्चेत

तिरुपती : तिरुपती येथे झालेल्या एका कार्यक्रमात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी

वाढदिवसाची पार्टी, धुम्रपानास जबरदस्ती अन् कारमध्ये बलात्कार!

उदयपूरमधील आयटी कंपनीच्या मॅनेजरची 'ती' काळरात्र उदयपूर: राजस्थानमधील उदयपूर येथे एका खाजगी आयटी कंपनीच्या

भारतीय जॉब मार्केटची विक्रमी झेप; 'एआय'मुळे भरती प्रक्रियेला वेग

९ कोटींहून अधिक जॉब अॅप्लिकेशनची नोंद नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आणि रोजगार बाजारपेठेसाठी २०२५ हे

शाळांमध्ये सकाळचा नाश्ता देण्याची केंद्राची सूचना

शिक्षणासोबत पोषणावर भर नवी दिल्ली : शालेय विद्यार्थ्यांना संतुलित व पुरेसे पोषण मिळावे, या उद्देशाने केंद्र

‘जेन-झी’वर माझा विश्वास : पंतप्रधान मोदी

भारताचा ‘विकसित राष्ट्राचा’ निर्धार याच मुलांच्या हाती नवी दिल्ली : जेन-झी पिढीच्या मुलांवर माझा विश्वास असून,