Saturday, July 20, 2024
Homeदेशहायवे अपघातात मृत्यू झाल्यास २५ हजार नव्हे तर २ लाख रुपये मिळणार

हायवे अपघातात मृत्यू झाल्यास २५ हजार नव्हे तर २ लाख रुपये मिळणार

मोदी सरकारची मोठी घोषणा, १ एप्रिल २०२२ पासून नियम होणार लागू

नवी दिल्लीः रस्ते वाहतूक मंत्रालयाने हिट एन्ड रन दुर्घटनेत पीडित व्यक्तीसाठी नुकसान भरपाई म्हणून १२ हजार ५०० रुपये ऐवजी आता ५ हजार रुपये देण्यात येणार आहेत. याशिवाय, रस्ते वाहतुकीत मृत्यू झाल्यास नुकसान भरपाई म्हणून २५ हजार रुपयांऐवजी आता २ लाख रुपये देण्याचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतला आहे. हा नियम १ एप्रिल २०२२ पासून लागू करण्यात येणार आहे. भारतात रस्ते वाहतूक आणि राजमार्गवर हा नियम लागू करण्यात येणार आहे. याशिवाय, हिट एन्ड रन अॅक्सिडेंड पीडित व्यक्तीला नुकसान भरपाई म्हणून मोटर व्हीकल दुर्घटना फंड बनवण्यात आले आहे. याची माहिती मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

रस्ते वाहतूक आणि राजमार्ग मंत्रालयाने टू-व्हीलरच्या रिजिड व्हीकल आणि ट्रेलरमध्ये आता तीन डेक पर्यंत परवानगी दिली आहे. ट्रेलरचा वाहनाचा भाग ड्रायव्हरच्या केबिनच्या वर असायला नको. रविवारी अधिकृतपणे ही माहिती देण्यात आली आहे. यात म्हटले की, याच्या क्षमतेत ४० ते ५० टक्के वाढ होईल. रस्ते वाहतूक आणि राजमार्ग मंत्रालयाने २५ फेब्रुवारीला अधिसूचना जारी करून केंद्रीय मोटर वाहन नियम १९८९ मध्ये संशोधन करून रिजिड व्हीकल आणि ट्रेलर मध्ये टूव्हीलरसाठी जास्तीत जास्त तीन डेकची परवानगी दिली आहे.

वेगळ्या जारी अधिसूचनेत मंत्रालयाने म्हटले की, पैसा घेऊन जाणाऱ्या गाड्या (कॅश व्हॅन) भारतीय मानक ब्यूरो अधिनियम २०१६ अंतर्गत (बीआयएस) नियम अधिसूचित होण्यापर्यंत वाहन उद्योग मानक 163:2020 च्या कमीत कमी कालावधीत पूर्ण करतील. यावरून कॅश व्हॅनच्या विशेष उद्देशीय वाहन रुपात विनिर्माण, टायर, मंजुरी परिक्षण आणि नोंदणी करण्यास मदत मिळेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -