Tuesday, October 21, 2025
Happy Diwali

शिवरायांचे रामदास कधीच गुरु नव्हते

शिवरायांचे रामदास कधीच गुरु नव्हते

सातारा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यामुळं राज्यपाल पुन्हा वादात सापडले आहेत. त्यांच्यावर शिवप्रेमींमधून टीका होत आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील राज्यपालांवर टीका केली आहे.

उदयनराजे यांनी फेसबुक पोस्ट करत म्हटलं आहे की, राष्ट्रमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या गुरू होत्या तर रामदास हे कधीही गुरु नव्हते. हा खरा इतिहास आहे. तरीही औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांचा संदर्भ देवून चुकीचा इतिहास सांगितला आहे. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतप्त प्रतिक्रिया येत आहेत, असं उदयनराजेंनी म्हटलं आहे.

त्यांनी म्हटलं आहे की, खरं तर राज्यपालांनी आपल्या पदाची मर्यादा ठेवून वक्तव्य करायला हवे होते. त्यांच्या वक्तव्यामुळे शिवप्रेमींसह संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत. तरी राज्यपाल कोश्यारी यांनी आपले वक्तव्य त्वरित मागे घ्यावे, असं उदयनराजेंनी म्हटलं आहे.

Comments
Add Comment