Thursday, May 22, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

मुंबई पोलीस आयुक्तपदी संजय पांडे यांची नियुक्ती

मुंबई : मुंबई पोलीस दलात खांदेपालट करण्यात आले आहे. राज्य सरकारने संजय पांडे यांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबईच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरुन मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून बदली केली आहे. तर, हेमंत नगराळे यांची मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरुन महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबईच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती केली आहे.


याआधी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदाची जबाबदारी संजय पांडे यांच्याकडे होती. त्यांच्या जागी रजनीश शेठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे राज्य सरकारने त्यांना मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्त केले आहे.


संजय पांडे हे वरिष्ठ आयपीएस अधिकारी असून नुकत्यात झालेल्या बदलीमुळे ते राज्य सरकारवर नाराज होते. संजय पांडे हे 1986 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन परमबीर सिंह यांची होमगार्डच्या प्रमुखपदी वर्णी लागल्याने संजय पांडे यांना तुलनेने कमी महत्त्वाच्या असणाऱ्या राज्य सुरक्षा महामंडळाच्या प्रमुखपदी नेमण्यात आले, त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. संजय पांडे यांच्या नाराजीनंतर त्यांना महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदावर नियुक्ती देण्यात आली होती.

Comments
Add Comment