मधुकर भावे
मराठी काव्यातील महान कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाला ‘मराठी भाषा दिन’ म्हणून गौरविले गेले. कारण कुसुमाग्रज यांनी १९४२च्या आॅगस्ट क्रांतीमधील धगधगत्या इतिहासाला ‘क्रांतीचा जयजयकार’ या महान कवितेने देशपातळीवर नेले. त्या िदवसाची हकिकत अंगावर काटा आणते. कुसुमाग्रज तेव्हा वि. वा. िशरवाडकर होते. पुण्याच्या ‘प्रभात’ दैनिकात ते उपसंपादक होते. वालचंद कोठारी हे संपादक होते. हे िबगरमराठी संपादक कट्टर संयुक्त महाराष्ट्रवादी होते. मराठीचे प्रेमी होते. कुसुमाग्रज यांची ‘गर्जा जयजयकार’ ही कविता ७ अॅागस्ट १९४२ रोजी प्रभात दैिनकात छापून आली. पुण्याच्या पोिलसांनी (आताच्या भाषेत ई.डी.) प्रभात दैनिकावर छापा टाकला. चौकशी सुरू केली. ‘कोण कुसुमाग्रज?’ संपादकीय विभागातील सगळे सदस्य एकमेकांना विचारू लागले… ‘अरे, कोण कुसुमाग्रज?…’ पोलिसांनी संपादकीय विभागाचे रजिस्टर तपासले. कर्मचाऱ्यांची नावे तपासली, तर त्यात कुसुमाग्रज हे नाव कुठेच नव्हते. वि. वा. िशरवाडकर म्हणजे कुसुमाग्रज हे पोलिसांना मािहती नव्हते. पोलीस िनघून गेले. कविता गाजली. आजही ‘ए मेरे वतन के लोगों…’सारखे ते क्रांती गीत आहे. पण त्याला चाल लावली गेली नाही. तरीही ते गीत गाताना अंगावर शहारे येतात. माझी पिढी कुसुमाग्रजांच्या त्या कविता गाऊन मोठी झाली. अशा या कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी मराठी भाषा दिन साजरा केला जातो.
२७ फेब्रुवारी रोजी हा दिन उत्साहात साजरा केला जाईल. माझी मराठी माऊली म्हणजेच संत ज्ञानेश्वर. तिथपासून ते कुसुमाग्रज यांच्यापर्यंत ही मराठी भाषा गौरवाची… अभिमानाची… आणि अमृताशी पैजा जिंकणारी… आज आग्रह आहे की, या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा. तो मिळणे सोपे नाही. ज्यांचा आग्रह आहे की, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, त्यांनाही ‘अभिजात’ म्हणजे नेमके काय हे माहिती नाही. तो दर्जा केंद्र सरकार देणार… देशातील सहा भाषांना हा दर्जा आहे. त्यामध्ये तामिळ, संस्कृत, कानडी, तेलुगू, मल्याळम आणि उडिया यांचा समावेश आहे. अभिजात दर्जा मिळण्याचे निकष केंद्र सरकारने ठरवलेले आहेत. त्यासाठी दीड हजार वर्षांपूर्वीचा त्या भाषेतील प्राचीन ग्रंथांचा मुख्य निकष आहे. मराठी भाषा ते निकष किती पुरे करेल, हे आज सांगता येत नाही. त्यामुळे अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकार लगेचच देईल, असे भाबडेपणे समजू नये.
मुख्य प्रश्न भाषेला अभिजात दर्जा मिळण्यापेक्षा मराठी भाषा ही ज्ञानभाषा होणे याला अधिक महत्त्व आहे. आज ती ज्ञान भाषा नाही. हे मान्य केले पाहिजे. मराठीचा स्वाभिमान असावा… पण वृथा अभिमान नसावा. मराठी भाषा कुठे कमी पडते आहे आणि त्याला कोण कारणीभूत आहे, हे समजून घेतले पाहिजे. मुळात मराठी भाषेचा उदय संस्कृत भाषेच्या प्रभावाखाली झाला. संस्कृतची प्राकृत भाषा झाली. सातवाहनच्या पैठण साम्राज्याने मराठी भाषेचा प्रथम वापर केला. ितथपासून मराठी भाषेचा प्रसार सुरू झाला. संत ज्ञानेश्वरांनी संस्कृतमधील गीता प्राकृतामध्ये आणली आणि अमृताशी पैजा जिंकण्याची मराठीला स्फूर्ती िदली. संत ज्ञानेश्वर माऊलींचे काम फार मोठे आहे. छत्रपती िशवाजी महाराज यांनी मराठी साम्राज्य स्थापन करताना मराठी भाषेला राजाश्रय दिला. हा सगळा इितहास देशाला मािहती आहे. देशाला स्वातंत्र्य िमळताना महाराष्ट्र, बंगाल आणि पंजाब या तीन राज्यांचा त्याग सगळ्यात मोठा होता. स्वातंत्र्य िमळाल्यानंतर केंद्र सरकारने अधिकृत राज्यभाषेचा दर्जा मराठी भाषेला िदला. १९६० मध्ये महाराष्ट्र राज्य झाल्यानंतर त्यावेळचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ‘मराठी असल्याचा शासकीय आदेश जारी केला. तो ११ जानेवारी १९६५ रोजी.’ १ मे १९६६चे वसंतराव यांनी मुख्यमंत्री म्हणून केलेले भाषण आजही वाचून पाहावे. त्यांनीच चार प्रादेशिक स्तरावर मराठीची सक्ती केली. राज्यकारभार मराठी भाषेतून चालणार, हेही त्यांनीच जाहीर केले. महाराष्ट्र दिन हा १ मे रोजी साजरा करताना त्याचे स्वरूप मराठी भाषा दिन असे नसले तरी महाराष्ट्राचा जयजयकारच त्या िदवशी होत होता. प्रत्यक्षात ‘मराठी भाषा दिन’ हा २१ जानेवारी १९१३ रोजी शासकीय आदेशाने साजरा करण्याचा निर्णय झाला आणि कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी तो करावा, असाही निर्णय झाला. तेव्हापासून २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन साजरा केला जातो.
भारतीय राज्यघटनेत २२ अधिकृत भाषांच्या यादीत मराठीचा समावेश आहे आणि महाराष्ट्रात राज्य सरकारची एकमेव अधिकृत राजभाषा मराठी आहे. गोवा राज्यामध्ये बोलतात मराठी पण अधिकृत राजभाषा कोकणी आहे. दादरा-नगरहवेली केंद्रशासित प्रदेश आहे. ितथे अधिकृत राजभाषा मराठी आहे. महाराष्ट्राबाहेर गोवा (पणजी), बडोदे, गुलबर्गा, इंदूर, िदल्ली येथे मराठी उच्चशिक्षण विभाग आहेत. महाराष्ट्राबाहेर एकूण १५ विद्यापीठांत मराठी भाषा िशकवली जाते. जगात ७२ देशांत मराठी भािषक प्रामुख्याने आहेत. त्यात मॉरिशस आणि इस्त्राईलमध्ये बाजारपेठेतही मराठी भाषा बोलली जाते. अमेिरका, युरोप, आिफ्रका, पािकस्तान, िसंगापूर, जर्मनी, अाॅस्ट्रेलिया, न्यूझीलंड या देशांतही मराठी भाषा मोठ्या प्रमाणात बोलली जाते. ितथे मराठी सांस्कृतिक केंद्रेही आहेत. यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षात अमेरिकेतील अशाच मराठी सांस्कृितक केंद्रांनी यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दीिनमित्त माझी दहा व्याख्याने अमेिरकेत आयोिजत केली होती आणि त्या व्याख्यानांना ३०० पर्यंत मराठी भाषिक उपस्थित होते. ठाणेदार, संदीप वासलेकर, बोस्टचे बाळ महाले यांनी फार मेहनत घेतली. वॉिशंग्टनला तर संजय पुरी या िबगर मराठी भाषिकाने केवढा कार्यक्रम आयािजत केला होता.
२७ फेब्रुवारी हा जगभरात मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. त्याचा सर्वांनाच आनंद आहे. पण दोन मुद्द्यांची चर्चा आवश्यक आहे. मराठीला अभिजात दर्जा िमळावा याचा आग्रह ठीक आहे. पण तो िमळणे सोपे नाही. त्याच्या िनकषात मराठी कमी पडते आहे. मला स्वत:ला असे वाटते की, अभिजात भाषेच्या दर्जापेक्षासुद्धा मराठी ज्ञानभाषा होणे हे अधिक महत्त्वाचे अाहे. त्यासाठी मराठी माणूस नेमके काय करीत आहे? भाषाप्रेमी काय करत आहेत? साहित्य संमेलनाचे अध्यक्ष काय करतात? मराठी साहित्य परिषदा काय करतात? रोजच्या व्यवहारात मराठी भाषा बोलण्याचा आग्रह आपण िकती धरतो? रोजच्या व्यवहारात आपण िकती इंग्रजी शब्द वापरतो? मुंबईमध्ये प्रत्येक मराठी माणूस बसथांब्यावर असो िकंवा रेल्वेमध्ये असो. हिंदीतच बोलायला सुरुवात करतो. पदोपदी इंग्रजी शब्द आपण वापरतो. घाईने जाणारा माणूस सांगत असतो की, “अरे, हॉस्पिटलमध्ये चाललो आहे. आईला अॅडमिट केले आहे. सिरियस आहे, आयसीयूमध्ये आहे. उद्या अॅापरेशन आहे” विज्ञानाचा भाषा उपयोग करताना मराठी खूप मागे पडत आहे. संगणकाच्या जगात मराठी खूपच मागे पडत आहे. माझ्या िपढीला ‘अ’- अननसातला िशकवला गेला… आता ‘अ’- अपलोड असा िशकवला जातो. मला ‘ड’ िशकवताना गुरुजी सांगायचे, डमरूतला ‘ड’… आता ‘ड’ डाऊनलोडमधला आहे. संगणकीय संदर्भातील कोणताही शब्द बघा. फॉरवर्ड, मेसेज, सेव्ह, सेंड, मेल, रिसिव्ह, कॉल, कॉपी सगळेच शब्द आपण सर्रास इंग्रजीच वापरतो. त्याला पर्यायी शब्द नाहीत. इंग्रजी, उर्दू, पर्शियन, हिंदी या भाषांतील सगळी उसनवारी करून आपण सर्रास शब्द उचलेले आहेत आणि त्यांना मराठी करून टाकले आहे. ‘माझ्यावर काय मेहरबानी करतोस काय…’ यातील मेहरबान हा शब्द आपला नाही. िखडकी शब्द आपला नाही. अशा मराठी नसलेल्या शब्दांची यादी खूप मोठी आहे. िक्रकेटच्या खेळातील सर्वच शब्द आपण इंग्रजीत वापरतो, अशा स्थितीत मराठी भाषा समृद्ध होणार कशी? आणि ज्ञानभाषा होणार कशी? शिवाय मराठीबद्दल जे जे कोणी अगदी अिभमानाने बोलतात. त्या पालकांनी आपल्या सर्व मुलांचा इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेश घेतलेला असतो. त्यामुळे मराठीचा अभिमान बाळगताना मराठी भाषा अभिजात होणे दूरच राहिले. ती ज्ञानभाषा होणे त्याहून कठीण झाले आहे. इंग्रजीमधील िलपीत २६ अक्षरेच आहेत. जगामधील िकती देशांत इंग्रजी बोलले जाते? अमेिरका आणि इंग्लंड, युरोपमधील सर्व देशांत युरो हे त्यांचे नाणे आहे. पण जर्मनीमध्ये इंग्रजी बोलून बघा. डेन्मार्कमध्ये इंग्रजी बोलतात का बघा. मी फ्रॅकफूटला असताना व्हेअर इज अ स्टेशन? असे इंग्रजीत विचारले, तर तो माणूस माझ्या अंगावर येऊन जोरात ओरडला… इंग्रजीतच… टाॅक इन जर्मन… मग स्टेशनचा पर्यायी शब्द हाफबान-हाफ असा जर्मनीत असल्याचे समजले. डेन्मार्कमध्येही तेच, ते डच बोलतात. रशियातील कोणीही इंग्रजी बोलत नाही. रशियन भाषा त्यांनी ज्ञानभाषा त्यांनी केलेली आहे. आपल्यापेक्षा हिंदीमध्ये िकतीतरी पटीने समृद्ध शब्द आहेत. मराठी भाषेचा अिभमान बाळगताना आपल्या भाषेचा ज्ञानभाषा म्हणून टिकाव लागेल, यासाठी आपण काय करणार? िकती मराठी कवितांत अन्य शब्द आहेत? खुद्द कुसुमाग्रजांनी देशाच्या स्वातंत्र्याला ५० वर्षे झाली तेव्हा जे गीत िलहिले, त्यातील दुसराच शब्द.
“पन्नाशीची उमर गाठली…”
‘उमर’ हा शब्द मराठी नाही. मराठी बोलताना वाक्यावाक्याला आपल्या इंग्रजी-हिंदी शब्दांची गरज लागते आणि म्हणून मराठी भाषेचा अिभमान बाळगताना त्या भाषेला अभिजात दर्जा िमळवताना त्याच वेळी ती ज्ञानभाषा होईल, याकरिता आपण कोणता दिन साजरा करणार? मराठी भाषा दिन जरूर साजरा करावा, पण मराठीला ज्ञानभाषा दिन करण्याचा िदवस कोणता? हे कोण सांगू शकेल?