'मन की बात'चा उद्या ८६वा भाग

  74

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद मोदी, रविवार २७ फेब्रुवारी सकाळी ११ वाजता 'मन की बात' कार्यक्रमाद्वारे नागरिकांशी संवाद साधणार आहेत. मन की बात चा हा ८६ वा भाग असेल. २०२२ वर्षाचा हा दुसरा भाग असणार आहे.


'मन की बात' चे थेट प्रसारण नमो आप्लिकेशन, दूरदर्शन, प्रसार भारती आणि आकाशवाणीच्या सर्व प्रदेशिक केंद्रांद्वारे, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्र सरकारच्या विविध सामाजिक माध्यमांद्वारे केले जाते. मुख्य भागाच्या प्रसारणानंतर हिंदी शिवाय इतर भारतीय भाषांमध्येही मन की बात चे प्रसारण आयोजित केले जाते.


काही दिवसांपूर्वी जागतिक रेडिओ दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते, "रेडिओ हे सकारात्मकता सामायिक करण्याचे तसेच इतरांच्या जीवनात दर्जात्मक बदल घडवून आणण्यात आघाडीवर असलेल्यांना ओळख मिळवून देण्याचे एक उत्तम माध्यम असू शकते याचा मी 'मन की बात' मुळे वारंवार प्रत्यय घेतला आहे. या कार्यक्रमासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो."

Comments
Add Comment

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना मिळाली मदत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याशी साधला संवाद एनडीआरएफच्या

अरबी समुद्रात तेलवाहक जहाजाला आग, भारतीय नौदलाने १४ जणांना वाचवले

मुंबई : अरबी समुद्रात 'एमटी यी चेंग' नावाच्या तेलवाहक जहाजाला आग लागली. भारतीय नौदलाने आग लागल्याची माहिती मिळताच

उत्तराखंडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, महाराष्ट्राचे २०० पर्यटक अडकले

मुंबईतील ५० जणांचा समावेश उत्तराखंड: उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे केदारनाथजवळ भूस्खलन झाल्याची बातमी समोर आली

शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट, चौघांचा मृत्यू

शिवकाशी : तामिळनाडूतील शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे चार मजुरांचा मृत्यू झाला आणि पाच जण

तेलंगणातील रसायनाच्या कारखान्यात स्फोट, ३४ ठार

पटानचेरू : तेलंगणातील पटानचेरू येथे सिगाची केमिकल्स नावाच्या रसायनाच्या कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे

Crime News : धक्कादायक! महाराष्ट्रातील ७० वर्षीय आजीवर पहलगाममध्ये लैंगिक अत्याचार; ब्लँकेटने झाकले अन्...

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पहलगाममध्ये