Friday, January 17, 2025
Homeताज्या घडामोडी'एनएसई' घोटाळ्यातील आनंद सुब्रमण्यम ६ मार्चपर्यंत सीबीआय कोठडीत

‘एनएसई’ घोटाळ्यातील आनंद सुब्रमण्यम ६ मार्चपर्यंत सीबीआय कोठडीत

चित्रा रामकृष्ण आणि अज्ञात योगी प्रकरणी सुमब्रमण्यम यांची चौकशी होणार

मुंबई : ‘एनएसई’ को-लोकेशन प्रकरणी सीबीआयच्या अटकेत असलेल्या आनंद सुब्रमण्यम यांना ६ मार्च २०२२ पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. ‘एनएसई’ को-लोकेशन घोटाळ, चित्रा रामकृष्ण आणि अज्ञात योगी प्रकरणी सुमब्रमण्यम यांची चौकशी होणार असून यात अनेक रहस्यमय खुलासे होण्याची शक्यता आहे.

चित्रा रामकृष्ण आणि अज्ञात योगी प्रकारणानंतर आनंद सुब्रमण्यम तपास यंत्रणांच्या रडारवर होते. गुरुवारी रात्री त्यांना सीबीआयने अटक केली. शुक्रवारी दिल्लीतील एका न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे हजर करण्यात आले. न्यायालयाने सुब्रमण्यम यांना ६ मार्च २०२२ पर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली.

सुब्रमण्यम १ एप्रिल २०१३ रोजी एनएसईमध्ये मुख्य सल्लागार म्हणून रुजू झाले होते. २०१५ मध्ये ते एनएसईचे ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर झाले आणि एनएसईच्या तत्कालिन व्यवस्थापकीय संचालक चित्रा रामकृष्ण यांचे सल्लागार म्हणून बढती देण्यात आली. २१ ऑक्टोबर २०१६ पर्यंत ते या पदावर होते.

दरम्यान, आनंद सुब्रमण्यम यांना वित्तीय सेवा क्षेत्रातील कोणताही अनुभव नसताना त्यांना अशा पदावर नियुक्त केल्याबाबत भांडवली बाजार नियंत्रक सेबीने प्रश्न उपस्थित केला होता. सुब्रमण्यम यांना केवळ बढतीच मिळाली नाही तर गलेलठ्ठ पॅकेज देखील देण्यात आले होते.

सेबीने केलेल्या चौकशीमध्ये सुब्रमण्यम यांच्याबरोबर सहा कन्सल्टन्टची देखील नियुक्ती करण्यात आली होती. त्यापैकी सुब्रमण्यम यांना सर्वाधिक १.६८ कोटी रुपयांचे वार्षिक पॅकेज देण्यात आले होते. तर इतर कन्सल्टन्ट यांना प्रत्येकी १२ ते ३८ लाखांचे पॅकेज देण्यात आले होते.

‘एनएसई’ को-लोकेशन प्रकरणी झालेल्या गैरव्यवहारात सुब्रमण्यम यांचाच मुख्य हात असल्याचा सीबीआयला संशय आहे. मात्र गेल्या आठवड्यात चित्रा रामकृष्ण आणि आनंद सुब्रमण्यम यांना सेबीने दंड ठोठावतल्या नंतर हा संशय आणखी बळावला. सुब्रमण्यम यांच्याकडून रामकृष्ण यांचे ई-मेल आणि अज्ञात योगीशी झालेल्या विशिष्ट भाषेतील संवादाचा उलगडा होण्याची शक्यता आहे. सेबीने चित्रा रामकृष्ण यांना ३ कोटी रुपयांचा तर आनंद सुब्रमण्यम यांना २ कोटींचा दंड ठोठावला होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -