
युक्रेन : युक्रेनियन सैन्याच्या शस्त्रांनी भरलेल्या गोदामात स्फोट झाला आहे. या स्फोटाचा व्हिडिओ समोर आला आहे. तसेच युक्रेनच्या केंद्रीय लष्करी कमांडने रशियाने कीव बोरीस्पिल, निकोलायव्ह, क्रॅमतोर्स्क, खेरसन यासह अनेक विमानतळांवर बॉम्बहल्ला केल्याचा अहवाल दिला आहे. खार्किव लष्करी विमानतळ आता धुमसताना दिसत आहे. याचा व्हिडिओ समोर आला आहे.
https://twitter.com/TehranTimes79/status/1496757100722204678
रशियाचे पाच फायटर आणि एक हेलिकॉप्टर उडवल्याचा युक्रेन लष्कराचा दावा
रशियन सैन्याने म्हटले आहे की, त्यांनी युक्रेनच्या लष्करी आणि हवाई तळांना लक्ष्य करून ते नष्ट केले आहेत. दुसरीकडे युक्रेनने हार मानणार नसल्याचे म्हटले आहे. लुहान्स्क भागात रशियाची पाच विमाने आणि एक रशियन हेलिकॉप्टर पाडण्यात आल्याचे युक्रेनच्या लष्कराने म्हटले आहे.
युक्रेनची राजधानी कीवमध्ये रशियाने क्रूझ आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला आहे. युक्रेनमधील ओडेसा येथील ब्लॅक सी बंदरात स्फोट झाल्याची माहिती एएफपीने दिली आहे. गुरुवारी सकाळपासून युक्रेनच्या विविध भागातून स्फोटाचं वृत्त येत आहे. याआधी युक्रेनच्या पूर्वेकडील भाग आणि कीवमधून स्फोट झाल्याच्या बातम्या आल्या होत्या.
दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युद्धाची घोषणा केल्यानंतर युक्रेनने आपले एयरस्पेस बंद केले आहेत. रशियन हल्ल्यादरम्यान युक्रेनला भीती वाटत आहे की त्यांच्याकडे येणाऱ्या विमानांवर सायबर हल्ला होऊ शकतो. याशिवाय नागरी उड्डाणांना लक्ष्य करून गोळीबार होण्याचाही धोका आहे. युक्रेन स्टेट एअर ट्रॅफिक सर्व्हिसच्या म्हणण्यानुसार, धोका लक्षात घेऊन युक्रेनमधील एयरस्पेस गुरुवारी नागरी उड्डाणांसाठी बंद करण्यात आले आहे.
एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलमधील तेल अवीव येथून कॅनडातील टोरंटोला जाणाऱ्या विमानानं रात्री उशिरा युक्रेनच्या हवाई क्षेत्रातून अचानक यू-टर्न घेतला. या घटनेनंतर उड्डाणांबाबत सतर्कता आणखी वाढवण्यात आली आहे.
त्याचवेळी, गुरुवारी एअर इंडियाचे फ्लाइट क्रमांक AI1947 युक्रेनची राजधानी कीव येथून दिल्लीला परतले आहे. यामध्ये मेडिकल विद्यार्थ्यांसह अनेक भारतीय नागरिक मायदेशी आले आहेत.
रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनमध्ये मार्शल लॉ लागू करण्यात आला आहे. युक्रेनकडून युद्ध थांबवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राजधानी कीवचे विमानतळ रिकामे करण्यात आले आहे.
रशियन सैनिक युक्रेन महिलांना करताहेत फ्लर्टी मेसेज
एका युक्रेनियन महिलेनं दावा केला आहे की रशियन सैनिक तिला Tinderवर फ्लर्टी मेसेज पाठवत आहेत.