नाशिक : अंडरवर्ल्ड डॉन दाऊदकडून संपत्ती खरेदीप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने कारवाई केली असून त्यांनी तत्काळ मंत्री पदाचा राजीनामा द्या, अशी मागणी करत भाजपने पक्ष कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केले.
मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. एन. डी. पटेल रोड येथील कार्यालयाबाहेर मंत्री नवाब मलिक यांच्या फोटोला जोडे मारत भाजपने निषेध नोंदवला.
आंदोलनादरम्यान आघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ जर राष्ट्रवादी आंदोलन करत असेल तर हे दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया भाजप नेत्यांनी दिली. यावेळी नवाब मलिक यांच्या फोटोला जोडे मारत आघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी आ. प्रा. देवयानी फरांदे, नगरसेविका हिमगौरी आडके, माजी नगरसेवक सुरेश पाटील यांसह पदाधिकारी उपस्थित होते.