मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे आता अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) रडारवर आले आहेत. नवाब मलिकांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात नेण्यात आले होते. अखेर आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे.
आज पहाटे ईडीचे पथक नवाब मलिक यांच्या घरी धडकले होते. त्यानंतर सकाळी सात वाजल्यापासून नवाब मलिक यांची ईडी कार्यालयात अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू होती.
ईडी अधिकारी बुधवारी पहाटे सीआरपीएफच्या जवानांना घेऊन नवाब मलिक यांच्या कुर्ला येथील नूर मंजील या निवासस्थानी दाखल झाले. त्यानंतर ईडीने कोणतेही समन्स न देता नवाब मलिक यांना चौकशीसाठी घेऊन गेले.
कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहीमचा भाऊ इक्बाल कासकरने जुन्या मालमत्ता व्यवहार प्रकरणी चौकशीत दिलेल्या माहितीच्या आधारे मंत्री नवाब मलिक यांची अंमलबजावणी संचालनालय (ईडी)कडून चौकशी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.
बांदीपोरा : जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी २६ पर्यटकांची हत्या केली. या घटनेनंतर भारताच्या सुरक्षा पथकांनी जम्मू…
उधमपूर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर उधमपूरमध्ये सुरक्षा पथक आणि अतिरेकी यांच्यात…
ट्विट करत दाखवलं भारतावरचं प्रेम बंगळुरू : भारतात बंगळुरू येथे २४ मे रोजी होणार असलेल्या एनसी…
पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी मंगळवार २२ एप्रिल २०२५ रोजी २६ पर्यटकांची हत्या…
आज २५ एप्रिल म्हणजे जागतिक मलेरिया दिन. डासांच्या चावण्यामुळे होणाऱ्या गंभीर आजारांपैकी एक मलेरिया आहे.…
मुंबई(ज्ञानेश सावंत): अठराव्या हंगामात चेन्नई व हैदराबाद यांना अजूनही सूर गवसलेला नाही.हैदराबादने सुरवातीला जो जोश…