मुंबई : अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मलिक यांच्या घरावर सक्तवसुली संचलनालयाच्या कारवाईनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असून आता राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने ईडीच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले जात आहे.
मात्र, पोलिसांनी आंदोलकांना कार्यलयाच्या थोड्या अंतरावरच थांबवले आहे. त्यांना ईडीच्या परिसरात जाऊ दिले जात नाही. मात्र, कार्यकर्ते आक्रमक पावित्र्यात असून ईडी आणि भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु आहे.
नवाब मलिक एनसीबी विरोधात आवाज उठवत होते तेव्हाच त्यांनी ट्विट केलं होतं की माझ्या घरी पाहुणे येणार आहेत. आज ते पाहुणे आले आहेत. आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने ईडी कार्यालयाबाहेर आंदोलन करणार आहेत. भाजप नेत्यांविरोधात ईडीच्या नोटिसीचे काय झाले? नारायण राणे, बबनराव पाचपुते यांच्यासह इतर नेत्यांविरोधातील तक्रारीचे काय झाले? असा सवाल राष्ट्रवादी युवा काँग्रेसने केला आहे. ‘आम्ही येत आहोत, अडवून दाखवा’ अशा इशारासुद्धा राष्ट्रवादीने दिला आहे.