सुडाच्या राजकारणाचा शेवट मीच करणार

  71

कणकवली (प्रतिनिधी) : सुडाचे राजकारण यांनी सुरू केले असले तरी शेवट मीच करणार. मी पुरा ९६... आहे, असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिला आहे. सिंधुदुर्ग येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राणे पुढे बोलताना म्हणाले, माझा बंगला तोडायची कोणाची हिंमत नाही. सर्व अटींची पूर्तता करून मालवणचा नीलरत्न बंगला बांधला. त्यात अनधिकृत काही नाही. अधिकृत असल्यामुळेच आम्हाला त्यावेळी भोगवटादार पत्र मिळाले. दुसरी गोष्ट मालवणच्या बंगल्याला कोणतीही नोटीस नाही. मुंबई आणि मालवण येथे कसलेही अनधिकृत बांधकाम नाही. मात्र खोट्या बातम्या देऊन नाहक बदनामी केली जात आहे. अशी बदनामी करणाऱ्यांना कायदेशीर नोटीस दिली जाणार असल्याचे यावेळी केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी सांगितले.


कोणतीही बातमी दुसऱ्याच्या दुःखात भर टाकण्यासाठी असू नये. कोकण आणि मालवणी लोक तक्रारींचे समर्थन करायला असतात, मात्र चांगले काम केले तर अभिनंदन करायला कोण आले नाहीत, असे नारायण राणे म्हणाले. मंत्री नवाब मलिक यांच्याबद्दल बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले, हे होणारच होते, मलिक यांचे आजचे संबंध नाहीत. अनेक वर्षांचे संबंध आहेत. अजून अनेकांचे नंबर लागतील. हळूहळू सर्व कळेल. नवाब मालिकांचे अनुकरण कोणी करू नये. आता बोल म्हणावे ईडी समोर, नाही तर तोंडात विडी देणार हे ईडीवाले. अशी मिश्कील टीकाही यावेळी नारायण राणे यांनी केली.


खासदार संजय राऊत बेजबाबदार बोलणार आणि आम्ही त्याला उत्तरे का द्यावीत. त्याची मानसिक स्थिती चांगली नाही. दिशा सालियन संदर्भात बोलताना नारायण राणे म्हणाले, दिशाला ज्याने मारले त्यांना शिक्षा व्हावी म्हणून आम्ही बोलतोय. दिशाच्या नातेवाइकांची यापूर्वी काय भूमिका होती, हे सुद्धा आम्हाला माहीत आहे. त्यामुळे योग्य न्यायासाठी आम्ही बोलत आहोत, असे ते म्हणाले.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग पंधरा वर्षे का रखडला? प्रवाशांना १ कोटीचा विमा आणि नुकसान भरपाईसाठी नितीन गडकरींना थेट पत्र

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामांमुळे त्रस्त झालेल्या कोकणवासीयांनी

मुसळधार पावसामुळे दुचाकीस्वार गेला वाहून, एनडीआरएफकडून तरुणाचा शोध सुरु...

सावंतवाडी : सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साठल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा

Ganesh Festival 2025 : चला गणपतीक गावाक जाऊचा असा; नियमित गाड्यांचे आरक्षण सुरु होतला…

कोकण मार्गावरील नियमित गाड्यांच्या आरक्षणाचे वेळापत्रक जारी झाल्याने रेल्वेच्या नियमांप्रमाणे ६० दिवसांचे

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर, माणगाव बायपास रस्त्यांचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चार पर्यायी रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश मुंबई : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बायपास

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाण्याखालील संग्रहालयाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

सेवानिवृत्त युद्धनौकेचे नवे स्वरूप, सागरी संवर्धन व पर्यटनाला चालना  मुंबई: आयएनएस गुलदार या नौदलातून

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक १७ तासांनंतर सुरू

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa highway) निवळी घाटात सीएनजी टँकर आणि खासगी मिनी बस यांच्यात झालेल्या भीषण