मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थान वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि शरद पवार यांच्यामध्ये तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. संध्याकाळी पाच वाजता ही बैठक पार पडणार आहे. मलिकांवरील अटकेच्या कारवाईमुळे सरकारच्या अडचणीत वाढ झाल्याने या बैठकीत नवाब मलिकांवर राजीनामा देण्यासाठी दबाव वाढण्याची शक्यता आहे.
यापूर्वी संजय राठोड आणि अनिल देशमुख यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर आता नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची शक्यता आहे.
तर दुसरीकडे शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानीही राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. त्यामुळे आता या दोन बैठकांमध्ये काय घडणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.