नवाब मलिक यांच्या ईडी चौकशीवर आशिष शेलारांचे ट्विट
मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आक्रमक झाले आहेत. तर दुसरीकडे भाजपच्या नेत्यांनीही ट्विट करून राष्ट्रवादी काँग्रेसला डिवचायला सुरुवात केली आहे.
मी खीर खाल्ली तर बुड बुड घागरी….!
असं म्हणताना, ज्याने खीर खाल्ली नाही, त्याने घाबरण्याचे कारण नाही.
पण ज्याने ज्याने खीर खाल्ली त्याने त्याने किती ही चेहरा भोळा भाबडा केला, कांगावा केला, तरी घागर बुडणारच!— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 23, 2022
भाजप नेते आशिष शेलार यांनीही ट्विट करून नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला. मी खीर खाल्ली तर बुड बुड घागरी….! असं म्हणताना, ज्याने खीर खाल्ली नाही, त्याने घाबरण्याचे कारण नाही. पण ज्याने ज्याने खीर खाल्ली त्याने त्याने किती ही चेहरा भोळा भाबडा केला, कांगावा केला, तरी घागर बुडणारच!, असा मजकूर आशिष शेलार यांनी ट्विटमध्ये लिहिला आहे. त्यामुळे आता ‘ईडी’च्या चौकशीतून काय निष्पन्न होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.