मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक केली आहे. या कारवाईनंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी एक ट्वीट करत एक ठाकरे सरकारला डिवचले आहे.
अनिल देशमुख यांच्यानंतर नवाब मलिक आणि आता तिसरा नंबर अनिल परब यांचा नंबर लागणार असल्याचे सोमय्या यांनी ट्वीटमध्ये म्हटले असून, अनिल परब यांना आत्ता हिशोब द्यावा लागणार असल्याचे म्हटले आहे.