रांची : डोरंडा कोषागारातून १३९.३५ कोटी बेकायदेशीरपणे काढल्याच्या चारा घोटाळ्याप्रकरणी आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. रांची सीबीआय कोर्टचे विशेष न्यायाधीश एसके शशी यांनी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही शिक्षा सुनावली. लालू प्रसाद यांना ६० लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. या प्रकरणात दोषी आढळलेल्या आणखी ३७ जणांना शिक्षा सुनावण्यात आली आहे.
१५ फेब्रुवारी रोजी लालू प्रसाद यांच्यासह ३८ आरोपींना दोषी ठरवण्यात आले होते. यानंतर लालू प्रसाद यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली. लालू प्रसाद यांना उपचारांसाठी तुरुंग प्रशासनाने रिम्समध्ये पाठवले होते. लालू प्रसाद हे रिम्स मधूनच कोर्टात उपस्थित होते. शिक्षा सुनावण्यापूर्वी सीबीआयने सर्व दोषींना जास्तीत जास्त शिक्षा देण्याची विनंती केली. बचाव पक्षाने किमान शिक्षेचा आग्रह धरला.
रांची न्यायालय परिसरात बिहारमधूनही मोठ्या संख्येने आरजेडी नेते आणि कार्यकर्ते पोहोचले होते.