Sunday, April 27, 2025
Homeक्रीडाजडेजाचे पुनरागमन; श्रीलंकेचा भारत दौरा

जडेजाचे पुनरागमन; श्रीलंकेचा भारत दौरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेनंतर भारताचा संघ घरच्या मैदानावर श्रीलंकेचा पाहुणचार करणार आहे. या मालिकेत अष्टपैलू रवींद्र जडेजा पुनरागमन नक्की मानले जात आहे मात्र, माजी कर्णधार विराट कोहली विश्रांती घेण्याची दाट शक्यता आहे. तीन टी-ट्वेन्टी आणि दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत यजमानांचा नवा कसोटी कर्णधार ठरणार आहे.

२०२१मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या कानपूर कसोटीनंतर जडेजा दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. त्याच्या निवडीबाबत अजूनही साशंकता आहे. पण, तंदुरुस्ती चाचणीत तो यशस्वी ठरला, तर त्याचे पुनरागमन निश्चित आहे. तो टी-ट्वेन्टी मालिकेतही खेळू शकेल. जडेजा हा बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पुनर्वसनासाठी गेला होता. तो आता लखनौ येथे दाखल झाला आहे आणि तिथे २४ फेब्रुवारीला पहिला टी-ट्वेन्टी सामना होणार आहे. तो लखनौ येथे क्वारंटाईनमध्ये आहे आणि त्याची कोरोना चाचणी केली जाणार आहे. ती निगेटिव्ह आल्यास त्याचा टी-ट्वेन्टी संघात समावेश केला जाईल. जडेजासह जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमरा याचेही पुनरागमन अपेक्षित आहे. या दोघांना विंडीजविरुद्धच्या मालिकेत विश्रांती दिली गेली होती.

रोहित शर्मा बनणार कसोटी कर्णधार

दक्षिण आफ्रिका दौऱ्यात विराट कोहलीने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले होते. त्यानंतर भारतीय संघ पहिलीच कसोटी मालिका खेळणार आहे आणि कर्णधारपदी रोहित शर्माचीच निवड होण्याची शक्यता आहे. दरम्यान, कोहली हा टी-ट्वेन्टी मालिकेत विश्रांती घेण्याची शक्यता आहे.

मालिकेचे सुधारित वेळापत्रक

  • पहिली टी-ट्वेन्टी २४ फेब्रुवारी लखनौ
  • दुसरी टी-ट्वेन्टी २६ फेब्रुवारी धरमशाला
  • तिसरी टी-ट्वेन्टी २७ फेब्रुवारी धरमशाला
  • पहिली कसोटी ४ ते ८ मार्च मोहाली
  • दुसरी कसोटी १२ ते १६ मार्च बंगळुरू ( डे नाईट)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -