युक्रेनवर तोफगोळ्यांचा वर्षाव कोणी केला?

युक्रेन : युक्रेनच्या सीमेवर रशियाने सैन्याची कुमक वाढविल्याची बातमी ताजी असतानाच आता गेल्या २४ तासांपासून युक्रेनवर तोफगोळे आणि गोळीबाराचा वर्षाव सुरु झाल्याचा दावा युक्रेनने केला आहे. रशिया समर्थित फुटीरतावाद्यांनी हे तोफगोळे डागल्याचा आरोप युक्रेनने केला आहे. तर दुसरीकडे रशियाने हे आरोप फेटाळले आहेत. हा गोळीबार रशिया हल्ला करणार अशी शक्यता असताना करण्यात आल्याने युक्रेनवर तोफगोळ्यांचा वर्षाव कोणी केला असा प्रश्न पडला असून एकच गोंधळ उडाला आहे.


सीमारेषेवरील एका गावावर हे तोफगोळे डागण्यात आले आहेत. एका किंडरगार्टनवर हे तोफगोळे पडले. न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध कोणत्याही क्षणी सुरु होण्याची शक्यता आहे. याचवेळी फुटीरतावादी गटाने युक्रेन गोंधळात पडावा आणि रशियावर हल्ला सुरु करावा, या मनसुब्याने हा हल्ला केल्याची शक्यता वर्तविली आहे.


रशियाने दोन दिवसांपूर्वी सैन्य मागे घेत असल्याचे सांगत सीमेवर सात हजार सैन्य वाढविल्याचे सॅटेलाईट फोटोमध्ये दिसले आहे. प्रत्यक्षात हे सैन्य माघारी जात नव्हते तर युक्रेनच्या दिशेने सर्वाधिक जवळच्या रस्त्यावरून कूच करत होते.


फुटीरतावाद्यांनी गेल्या २४ तासांत युक्रेनच्या हद्दीत चार वेळा गोळीबार केला. तर युक्रेनने बंडखोरांवर गोळीबार केला असा आरोप युक्रेनवरही करण्यात आला आहे. बंडखोरांनी बालवाडीवर हल्ला केल्याचे युक्रेनच्या वतीने सांगण्यात आले. तर रॉयटर्सच्या छायाचित्रकाराने लुहान्स्क प्रदेशातील युक्रेनियन बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या कादिव्का शहराच्या दिशेने गोळीबार झाल्याचे ऐकले. लुहांस्क पीपुल्स रिपब्लिक या विद्रोही संघटनेने सांगितले की, युक्रेनने हल्ल्यामध्ये मोर्टार, ग्रेनेड लाँचर आणि मशीनगनचा वापर केला.


युक्रेनच्या सशस्त्र दलांनी मोठी शस्त्रे वापरून युद्धविरामाचे उल्लंघन केले आहे, जे मिन्स्क करारानुसार मागे घेणे आवश्यक आहे, असा आरोप फुटीरतावाद्यांनी केला. तर लुहान्स्क प्रदेशातील स्टानित्सा लुगांस्क या गावावर फुटीरतावाद्यांनी गोळीबार केला. अतिरेक्यांनी जड तोफखान्याचा वापर केला., असा आरोप युक्रेनच्या सैन्याने केला आहे.

Comments
Add Comment

अमेरिका-व्हेनेझुएला यांच्यातील तणाव वाढला, अमेरिकेचा ड्रग्ज जहाजावर मोठा हल्ला

वॉशिंग्टन: अमेरिकेने व्हेनेझुएलाहून अमेरिकेकडे येत असलेल्या एका संशयित ड्रग्ज जहाजावर पुन्हा एकदा लष्करी

नेपाळमध्ये सुशीला सरकारचा मोठा निर्णय, आंदोलनादरम्यान प्राण गमावलेल्या Gen-Z ला मिळणार शहीदांचा दर्जा

काठमांडू: नेपाळमध्ये सुशीला कार्की सरकार स्थापन झाल्यानंतर देश हळूहळू आता स्थिरस्थावर होत आहे. सोमवारी सुशीला

नेपाळ, फ्रान्सनंतर आता इंग्लंडमध्ये निदर्शन रॅली, लाखो लोकं रस्त्यावर

लंडन: नेपाळ आणि फ्रान्सनंतर आता आंदोलनाचे वारे ब्रिटनच्या रस्त्यावर देखील दिसून आले आहे. सर्वात महत्वाचे

अमेरिका रशियावर कठोर निर्बंध लादणार

नाटोला चीनवर ५० ते १०० टक्के टॅरिफ लादण्याची मागणी वॉशिंग्टन डीसी (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

सुशीला कार्की नेपाळच्या नव्या हंगामी पंतप्रधान

नेपाळची संसद बरखास्त, हंगामी सरकारचे नेतृत्व करणार नवी दिल्ली : नेपाळमध्ये मागील काही दिवसांपासून मोठ्या

‘या’ देशातील ९९ टक्के लोक वापरत नाहीत सोशल मीडिया

इंटरनेट सुविधा अत्यंत मर्यादित नैरोबी : आजकाल प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन दिसतो, ज्यात सोशल मीडियावर लोक