सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्वीकृत संचालकपदी भाजपा आमदार नितेश राणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आज जिल्हा बँकेच्या सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली. दरम्यान दुसरे स्वीकृत संचालक म्हणून कुडाळचे प्रकाश मोर्ये यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या अध्यक्षतेखाली ओरोस येथे जिल्हा बँकेच्या सभागृहात बैठक झाली. यावेळी बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, गजानन गावडे, महेश सारंग, बाबा परब, विठ्ठल देसाई, प्रज्ञा ढवण, नीता राणे, व्हिक्टर डांटस, समीर सावंत, रवी मंडगावकर, सुशांत नाईक, आत्माराम ओटवणेकर, विद्याप्रसाद बांदेकर, मेघनाथ धुरी आदी संचालक या बैठकीस उपस्थित होते. निवडीनंतर भाजपा पदाधिकाऱ्यांनी आमदार नितेश राणे आणि प्रकाश मोर्ये यांचे अभिनंदन केले.