Sunday, May 18, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीराजकीय

आयटीत तरतूद ३५६ कोटींची, घोटाळे २५ हजार कोटींचे कसे?

आयटीत तरतूद ३५६ कोटींची, घोटाळे २५ हजार कोटींचे कसे?

मुंबई : राज्याच्या माहिती-तंत्रज्ञान विभागासाठी देवेंद्र फडणवीस सरकारच्या पाच वर्षांच्या काळात ३५५ कोटी ८६ लाख रुपयांचीच तरतूद झाली. माहिती तंत्रज्ञान विभागांतर्गत येणाऱ्या माहिती-तंत्रज्ञान महामंडळामार्फत विविध शासकीय विभागांची ७२४ कोटी रुपयांची कामे या काळात करण्यात आली. दोन्हींची बेरीज केली तरी ती १,०८० कोटी ४ लाख रुपये इतकीच होते. मग या खात्यात २५ हजार कोटींचे घोटाळे कुठून झाले, असा प्रश्न तत्कालीन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी विचारला आहे.


विशेष म्हणजे, त्यातील ८० टक्के कामे ही केंद्रीय निधीमधून होतात आणि केंद्रीय योजनांतर्गत असतात. त्या-त्या वर्षी करण्यात आलेली तरतूद आणि खर्चाचा तपशील ऑन रेकॉर्ड आहे, याकडे या विभागाचे तत्कालीन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी लक्ष वेधले.


ते म्हणाले की, ३५६ कोटींची तरतूद अन घोटाळे २५ हजार कोटींचे हे न समजण्यासारखे आहे. खासदार संजय राऊत हे आधी मनोरंजन करायचे, आता हवा‘बाण’ सोडत आहेत. कायद्याच्या कसोटीवर असे बेताल आरोप टिकणार नाहीत, असे ते म्हणाले.

Comments
Add Comment